1000 Rupees Note :गेल्या काही दिवसांपासून देशात 2000 रुपयांच्या नोटा बंद होण्याच्या चर्चा सुरु होत्या. RBI कडून राबवण्यात आलेल्या या निर्णयामुळे अनेक लोकांची धावपळ झाली. RBI कडून या निर्णयाची अंमलबजवणी करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता, मात्र आता 2000 च्या नोटा बंद झाल्यानंतर 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा एकदा बाजारात चलन म्हणून वापरल्या जाऊ शकतात अशी बातमी फिरत आहे . मात्र यात काहीच तथ्य नसल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने दिली आहे.
1000 ची नोट देशात येणार नाही: 1000 Rupees Note
बाजारात जरीही 1000 च्या नोटा परत येण्याची चर्चा सुरु असली तरीही यात काहीच तथ्य नसलेचे RBI ने कबुल केले आहे. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्यानंतर पुन्हा 1000 च्या नोटांना स्थान (1000 Rupees Note) देण्याचा बँकेचा कोणताही विचार नाही असे RBIने म्हंटल आहे. त्यामुळे अधिकृत माहितीवर विश्वास ठेऊन निर्णय घेणे हेच सामान्य जनतेसाठी योग्य आहे. RBI हि देशातील सर्वोच्य बँक म्हणून ओळखली जाते, तसेच बँकिंग क्षेत्रातील सर्व महत्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी RBI ला आहे. या बँक व्यतिरिक्त इतर कोणत्याही बातम्यांना आपण ग्राह्य धरू नये.
बंद झाली 2000 ची नोट:
अलीकडेच RBI कडून 2000 रुपयांच्या नोटा चलनातून वजा करण्यात आल्या. या नोटांच्या वापरकर्त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत नोटा पुन्हा जमा करण्याची आणि बदलून घेण्याची मुदत देण्यात आली होती. RBIचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 2000 रुपयांच्या जवळपास नोटा बँकेजवळ परत आल्या आहेत. तरीही काही नोटा परत येणे बाकी असून, अजूनही नोटा परत येत आहेत. देशात अजूनही काही ठिकाणी नोटा परत करण्याची सुविधा दिली जाते. अश्यातच 1000 रुपयांच्या नोटा परत येण्याच्या चर्चा सुरु होत्या, मात्र यात काहीच तथ्य नाही हि गोष्ट खरी आहे.