मुकेश अंबानींची कमाल!! Jio च्या नफ्यात 15% वाढ

बिझिनेसनामा ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजारात आपला दबदबा सुरूच ठेवला आहे. रिलायन्स जिओ ने आपल्या निव्वळ नफ्यात 15 टक्क्यांनी घसघशीत वाढ केली आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत रिलायन्स जिओचा निव्वळ नफा 4,984 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

रिलायन्सने जानेवारी- मार्च 2023 तिमाहीतील आर्थिक निकालांचे डिटेल्स शेअर बाजारांना पाठवले. त्यानुसार, एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 16,203 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या आणि शेवटच्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा परिचालन महसूलही एका यापूर्वीच्या 2.11 लाख कोटी रुपयांवरून 2.16 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 66,702 कोटी रुपये होता तर एकूण महसूल सुमारे नऊ लाख कोटी रुपये होता.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे डिजिटल सेवा युनिट जिओ प्लॅटफॉर्मच्या आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात 15.6 टक्क्यांनी वाढ होऊन 4,984 कोटी रुपये झाला आहे. त्याच्या मागील वर्षी याच तिमाहीत जिओचा निव्वळ नफा 4,313 कोटी रुपये होता. जिओने देशभरात लोकांना 5G सेवा देण्यासाठी मोठ्या वेगाने काम सुरु केलं आहे. टेलर-मेड टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मद्वारे सक्षम डिजिटल समाज निर्माण करण्यासाठी जिओ वचनबद्ध आहे असं रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी यांनी एका निवेदनात म्हटले.