2000 Note Exchange : 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी 400 रुपयांचे कमिशन?

2000 Note Exchange : देशात काही दिवसांपूर्वी एक खळबळजनक घटना घडली. सरकार आणि रिझर्व बँककडून 2000 रुपयांची नोट बाजारातून कायमची हटवण्यात आली. कित्येक देशवासियांना यामुळे भरपूर त्रास झाला, पण तरीही केंद्रीय बँककडून पुरेशी मुदत आणि मुदत वाढ मिळाल्यामुळे तो त्रास काही जास्त चिघळला नाही. मात्र आता 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी 400 रुपयांचे कमिशन घेण्याचे काम सुरु असून RBI ऑफिस बाहेर ब्रोकर मात्र मालामाल झाल्याची बातमी समोर आली आहे.

दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत झाला घोळ: 2000 Note Exchange

रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून मे महिन्यात दोन हजार रुपयांच्या नोटा कायमच्या बंद करण्याबाबत नोटीस जारी करण्यात आली होती. यानंतर देशातील लोकांना जवळच्या बँकेत जाऊन नोटा बदलून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. रिझर्व बँक कडून 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत या नोटा बदलून घेण्याची अंतिम तारीख देण्यात आली होती. ठरलेल्या मुदतीपर्यंत ज्यांनी आपल्या नोटा बदलल्या नाही त्याच्या लांबच्या लांब रांगा बँकच्या कार्यालाच्या बाहेर पाहायला मिळतात, अश्यातच देशाची राजधानी दिल्लीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालया बाहेर 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ब्रोकर 400 रुपये घेतात अशी बातमी समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, 30 सप्टेंबर रोजी रिझर्व बँकने माहिती दिली होती कि 31 मार्च 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील बाजारात 3.56 लाख कोटी रुपयांच्या 2,000 रुपयांच्या नोटा वापरात होत्या. परंतु 29 सप्टेंबरपर्यंत यातील केवळ 96 टक्के नोटा बँका आणि RBIच्या 19 प्रादेशिक कार्यालयांमधून परत जमा करण्यात आल्या ज्यांची किंमत 3.43 लाख कोटी रुपये होती.