2000 Note Exchange : 2000 रुपयांच्या नोटेबाबत Amazon चा मोठा निर्णय; खरेदीवर काय परिणाम होणार?

बिझनेसनामा ऑनलाईन । जसं की आपण सगळेच जाणतो येत्या काही दिवसांनंतर 2000 रुपयांच्या नोटा (2000 Note Exchange) वापरता येणार नाहीत. रिझर्व बँक ऑफ इंडिया(RBI) काढून यापूर्वीच घोषणा करण्यात आली आहे की 30 सप्टेंबर हि आपल्या नोटा बदलून घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता जगातील प्रमुख ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म असलेल्या अमेझोनने मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार Amazon येत्या 19 सप्टेंबर 2023 पासून कॅश ऑन डिलिव्हरीवर 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारणार नाहीत.

Amazon कडून 2000 रुपयांचा स्वीकार बंद (2000 Note Exchange)

खरं तर Amazon वर कोणतीही वस्तू खरेदी करताना आपण एकत्र ऑनलाईन पेमेंट करतो किंवा आपली वस्तू घरी आल्यावर कॅश व डिलिव्हरी पद्धतीने विक्रेत्याजवळच पैसे देतो. परंतु आता अशा डिलिव्हरी साठी पैसे देत असताना तुम्ही १९ सप्टेंबर नंतर 2000च्या नोटा कंपनी स्वीकारणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ३० सप्टेंबर नंतर 2000 च्या नोटा चलनातून बाद होणार असल्यानेच Amazon ने याबाबतचा निर्णय घेतला आहे. सध्या जरी अमेझोन या नोटा स्वीकारात असलं तरी 19 तारखेनंतर कोणत्याही cash on delivery वर 2000 ची नोट स्वीकारली जाणार नाही.

2000 च्या नोटा लवकर बदलण्याची गरज:

रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गवर्नर शक्तीकांत दास यांनी जारी केले आहे की 30 सप्टेंबर पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या जाऊ शकतात. (2000 Note Exchange). त्यामुळे सर्व देशवासियांना लवकरात लवकर बँक मधून नोटा बदलून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. खरं तर यापूर्वी 2016 मध्ये सरकार कडून भ्रष्टाचार रोखण्यासाठी 500 व 1000 च्या नोटांवर कायमची बंदी घालण्यात आली होती. या नंतरच 2000 रुपयांच्या नोटा बाजारात वापरासाठी उपलब्ध झाल्या. मात्र आत्ता काही दिवसांतच या नोटा देखील वापरता येणार नाहीत.

तुम्ही कोणत्याही बँक मध्ये जाऊन 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकता (2000 Note Exchange). सध्या या नोटा बदल्यांची मर्यादा वीस हजार रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे. यासाठी बँक तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही.