बिझनेसनामा ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून (2000 Note Exchange) बाहेर केल्या असून 31 सप्टेंबर पर्यंत 2000 रुपयांचा नोटा बँकेत जमा करण्याच्या सूचना देशभरातील नागरिकांना केल्या होत्या. त्यानुसार आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार, 2000 रुपयांच्या एकूण नोटांपैकी जवळपास 93 टक्के नोटा परत आल्या आहेत. त्यामुळे अजूनही 7 टक्के नोटा नेमक्या कुठे आहेत हा प्रश्न निर्माण झालाय.
आत्तापर्यंत जमा नोटांची आकडेवारी जाहीर- (2000 Note Exchange)
RBI च्या माहितीनुसार 2000 रुपयांच्या 3.56 लाख करोड रुपये किंमतीच्या बाजारात वापरात होत्या त्यातील 3.32 लाख करोड रुपये किंमतीच्या नोटा आत्तापर्यंत बँकेत जमा करण्यात आल्या आहेत. म्हणजेच एकूण नोटांच्या 93 टक्के नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. म्हणजे लोकांकडे अजूनही 24,000 कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा आहेत, जे एकूण नोटांच्या सात टक्के आहे. अशी माहिती RBI ने जारी केलेल्या नोटिफिकेशन मध्ये दिली आहे.
सप्टेंबर मध्ये 16 दिवस बँकेला सुट्ट्या-
जर तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या या नोटा असतील आणि तुम्हाला त्या बँकेत बदलून (2000 Note Exchange)घ्यायच्या असतील तर उशीर करू नका. याचे कारण म्हणजे या महिन्यात 16 दिवस बँका बंद राहतील हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.या सुट्ट्यांमध्ये जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, महाराजा हरिसिंह जी यांची जयंती आणि ईद-ए-मिलाद-उल-नबी यांचा समावेश आहे. यातील काही सुट्ट्या राष्ट्रीय स्तरावर साजरी केल्या जातील, तर काहींमध्ये प्रादेशिक स्तरावर बँका बंद होतील.