2000 Note Exchange : 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची मुदत आता जवळ आली आहे. अजूनही जर का तुमच्या घरात या नोटा असतील तर वेळ निघून जाण्याआधी त्या बदलून घ्या. कोणत्याही परिस्थितीत या नोटा 30 सप्टेंबरच्या अगोदर बदलून घेणं हे प्रत्येक नागरिकासाठी अनिवार्य आहे. आता आधी वेळ दवडणे म्हणजे आपल्या हाताने आर्थिक नुकसान करवून घेणे असेच ठरणार आहे.
रिझर्व बँकचा 2000 ची नोट हटवण्याचा मोठा निर्णय:
केंद्रीय बँकेकडून या वर्षी मे महिन्यात 2000 रुपयांच्या नोटांचा वापर कायमचा थांबवण्याचा आदेश जाहीर करण्यात आला होता. आणि मग नोटा परत घेण्याची मोहीम जोरात सुरु झाली. रिझर्व बँकच्या आदेशाप्रमाणे 30 सप्टेंबर हि नोटा बदलून घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. या नंतर चलनात 2000 रुपयांच्या नोटांचा वापर करता येणार नाही. त्यामुळे चुकून सुद्धा अश्या नोटा न बदलता मागे राहणं तुमचं मोठं आर्थिक नुकसान करु शकतं.
आता नोटा कश्या बदल्याव्यात? 2000 Note Exchange
जर का तुमच्याजवळ दोन हजार रुपयांच्या नोटा असतील तर त्या घेऊन रिझर्व बँकेत जा. रिझर्व बँकने एकावेळी दहा नोटा बदलण्याची सुविधा उपलब्ध (2000 Note Exchange) करवून दिली आहे, याचाच अर्थ असा की तुम्ही 20 हजार रुपयांपर्यंतची रक्कम एकाच वेळी बदलून घेऊ शकता. यासाठी बँक कोणतेही शुल्क आकारात नाही, तसेच जर का तुमचा बँक मध्ये अकाऊट नसेल तरीही काळजी करण्याचे कारण नाही. कारण बँक पूर्णपणे सहकार्य करत तुम्हाला नोटा बदलून देईल.
नोटा बदलल्या नाहीत तर?
30 सप्टेंबर हि नोटा बदलून घेण्याची अंतिम तारीख आहे. या नंतर 2000 रुपयांच्या नोटांचा वापर तुम्हाला कोणत्याही आर्थिक देवाण घेवाणीत करता येणार नाही. हि नोट नंतर केवळ एक कागदाचा तुकडा असेल, त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत वेळेतच या नोटा बदलून घ्या व आर्थिक नुकसान होण्यापासून स्वतःला वाचवा.