2000 Rupees Notes: 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 रोजी संपल्यानंतरही, काही लोकांकडे अजूनही या नोटा आहेत तर आतापर्यंत एकूण 2000 रुपयांच्या 97.62 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. या नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत होती. या मुदतीपर्यंत, लोकांना बँका, पोस्ट ऑफिसेस आणि RBI च्या कार्यालयांमध्ये नोटा जमा करण्याची आणि त्या बदल्यात इतर नोटा मिळवण्याची सुविधा देण्यात आली होती.
यावेळी RBIचे स्पष्टीकरण काय? (2000 Rupees Notes)
2000 रुपयांच्या नोटा बंद होणार या बातम्यांनी अनेकांना गोंधळात टाकलं होतं. अनेकांनी या नियमाचे पालन करत नोटा परत देखील केल्या, तरीही काही लोकांजवळ या नोटा अजून बाकी आहेत. आता भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) या नोटांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सर्वोच्य बँकेच्या म्हणण्यानुसार 2000 रुपयांच्या नोटा अजूनही देशात कायदेशीर निविदा राहतील. याचा अर्थ, या नोटा तुम्ही व्यवहारांसाठी वापरू शकता.
रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 पासून दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर लोकांना बँकांमध्ये जाऊन 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत होती(2000 Rupees Notes). तरीही अनेकांना या नोटा बदलून घेता आल्या नाहीत,त्यामुळे RBI कडून ही मुदत 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली होती.