2023 Year Ender : 2023 हे वर्ष संपायला आता केवळ पाच दिवस बाकी आहेत. पाठीमागे वळून बघितलं तर यावर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेला आनंदाची बातमी मिळाली. जगभरातील दिग्गज देश त्यांची अर्थव्यव्यस्था सुधारायचा प्रयत्न करत असताना भारत मात्र तेजीत व्यव्यहार करीत होता. या सोबतच बाजारात अनेक मोठ मोठाल्या कंपन्यांनी कठीणातले कठीण प्रॉजेटक्स देखील यशस्वी करून दाखवले. हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूह संकटात सापडला होता मात्र काही दिवसांतच त्यांनी पुन्हा प्रगती करायला सुरुवात केली. भारत देशातील अनेक व्यावसायिकांनी फोर्ब्सच्या यादीत नाव मिळवले, यात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही समावेश झाला होता . भारत देश जोमाने प्रगती करतोय आणि आर्थिक वर्ष 2023 आपल्यासाठी खास महत्वाचे ठरलेय. परंतु एकीकडे सगळं होत असताना दुसरीकडे यंदाच्या वर्षात अनेक मोठ्या कंपन्यांच्या CEOs नी कामावरून काढता पाय घेतला. चला तर मग पाहुयात नेमक्या कोणत्या भारतीय दिग्गज कंपन्यांच्या CEOs नी मोलाची कामगिरी बजावल्यानंतर कंपनीचा कायमचा निरोप घेतलाय ..
कॉर्पोरेट क्षेत्रातील CEO नी घेतला काढता पाय: (2023 Year Ender)
देशाच्या कॉर्पोरेट विश्वात या वर्षी अनेक मोठाल्या कंपन्यांच्या CEOs नी ते कार्यरत असलेल्या कंपन्यांना कायमचा रामराम ठोकला आहे.CEO हे पद कोणत्याही कंपनीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावतं, तसेच या माणसाच्या खांद्यावर संपूर्ण कंपनीची जबाबदारी दिलेली असते. कंपनीच्या बाबतीत घेण्यात येणारे सर्व निर्णय CEOच्या मताशिवाय अपूर्ण ठरतात. आणि म्हणूनच कंपनीच्या CEO पदाचा राजीनामा दिल्यामुळे देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रात मोठे बदल झालेले पाहायला मिळाले. या कंपन्यांमध्ये खास करून कोटक महिंद्रा बँक,TCS ,OYO, JSW,ICICI इत्यादींचा समावेश होता.
या वर्षात (2023 Year Ender) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसिस या जगप्रसिद्ध कंपनीमधून CEO राजेश गोपीनाथन यांनी मार्च महिन्यात काढतापाय घेतला. यानंतर कंपनीचे कामकाज बिघडू नये म्हणून लगेचच जून महिन्यात कृतिवासन यांना नवीन CEO आणि MD म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. याशिवाय हैराण करणारी बातमी समोर आली ती कोटक महिंद्रा कडून, कंपनीचे CEO उदय कोटक यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे कंपनीमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते, त्यानंतर नवीन पदावर अशोक वासवानी यांची नियुक्ती करण्यात आली होती . OYO हि अकोमोडेशन कंपनी भारतात सर्वात चर्चेत असते, मात्र वर्ष 2023 मध्ये अंकित गुप्ता यांनी कंपनी सोडल्यामुळे वरुण जैन आणि गौतम स्वरूप यांच्यावर कंपनीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. JSW, ICICI, कतार एअरववेज, शॉपर्स स्टॉप अश्या एक ना अनेक कंपन्यांमधून त्यांच्या उत्तम आणि कुशल CEOs नी काढता पाय घेतला. हे एक प्रमुख पद असल्यामुळे सुरुवातीच्या काळात कंपन्यांना थोडा धक्का नक्कीच बसला मात्र वेळ सारवून घेत टॉप मॅनेजमेन्ट कडून वेगळ्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती.