5G Internet Speed : भारताच्या इंटरनेट स्पीडमध्ये मोठी सुधारणा; इंग्लंड- जपानला टाकलं मागे

5G Internet Speed । भारत सध्या प्रगतीच्या मार्गावर चालत आहे, सगळ्याच दिशेने पुढे वाटचाल करत भारत येणाऱ्या दिवसांत Developed Nation म्हणून ओळखलं जाईल एवढं मात्र नक्की. देशातील अनेक सुधारित राज्यांमध्ये मेट्रोची सेवा सुरु झाली आहे. जवळजवळ सगळ्याच राज्यांमध्ये गरजेची असणारी वाहतूक सेवेची सोय आहे, गावागावांमध्ये डॉक्टर आणि औषधांच्या सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत आणि वेळोवेळी अनेक योजना राबवत सरकार देखील देशातील रहिवाश्याची मदत करण्यात तत्पर आहे. यातच 5G ची सुविधा आल्यामुळे देशात इंटरनेटच्या बाबतीत मोठी सुधारणा झालेली पाहायला मिळते. भारताच्या इंटरनेट स्पीडमध्ये (5G Internet Speed) मोठी सुधारणा झाली असून आपण इंग्लंड- जपान यांसारख्या देशालाही मागे टाकलं आहे.

भारतात 5G Internet Services सुरु झाल्यामुळे फायदा- (5G Internet Speed)

देशात 5G ची सेवा सुरु झाल्यामुळे इंटरनेटच्या स्पीडमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. इंटरनेट हि आजच्या जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट मानली जाते आणि तेच खरंही आहे. आज पर्यंत आपण अन्न, कपडे, आणि राहायला घर अश्या तीन गोष्टींना जीवनमूल्य म्हणून ओळखायचो मात्र आता यात इंटरनेटचं नाव जोडलं तरीही वावगं ठरणार नाही. कोविडच्या काळात आपल्या देशात Work From Home हि संकल्पना सुरु झाली अनेकांना ती पटली, आवडली आणि अजूनही कितीतरी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना हि सुविधा देतात, आणि घरून काम करणार तर सगळ्यात महत्वाचं काय तर तो म्हणजे इंटरनेट.

5G सेवेच्या बाबतीत भारताचा विक्रमी पराक्रम:

आपल्या देशात 5G ची सेवा सुरु झाल्यापासून भारताने 119 स्थानावरून थेट 47व्या स्थानावर मोठी झेप घेतली आहे. भारतासमोर जपान, ब्रिटन, ब्राझील यांसारखे मोठे देश प्रतिस्पर्धी म्हणून उभे असताना सुद्धा भारताने हा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. ब्रोडबेंड आणि मोबाईल इंटरनेट नेटवर्कच्या गतीची माहिती देणाऱ्या ओकला नावाच्या कंपनीने हि माहिती समोर आणली आहे. भारतात 5G सेवा सुरु झाल्यापसून मोबाईल इंटरनेटच्या स्पीडमध्ये 3.59 टक्के वाढ (5G Internet Speed) झाली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये भारतातील सरासरी डाऊनलोडची स्पीड 13.87mbps अशी होती.