70 Hours Work Week : आठवड्यातून 70 तास काम करणे गरजेचं?? पहा निखिल कामत यांचे मत काय आहे?

70 Hours Work Week : Infosys चे मालक नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते ज्यांत त्यांनी देशातील तरुण पिढीला 70 तास काम करायची मागणी केली होती. त्यांच्या मते कामात गुंतल्यामुळे देशाची प्रगती व्हायला मदत होणार आहे. आपल्या देशात तरुण मंडळींची संख्या अधिक आहे व यालाच आपण आपली ताकद बनवून जगाच्या पाठीवर राज्य करू शकतो. देशातील अनेक जाणकार मंडळींकडून या विधानावर त्यांना पाठींबा देण्यात आला तर काही लोकांनी त्यांना विरोध केला. आता निखील कामत यांनी या संदर्भात एक विधान केले आहे. निखिल कामत नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया..

निखील कामात असं म्हणले: 70 Hours Work Week

हे जग फारच स्पर्धात्मक आहे. जगात अश्याही काही कंपन्या आहेत ज्या प्रत्येक आठवड्यात 4 दिवस न चुकता काम करतात. या जगात जर का टिकाव लागायचा असेल तर प्रतिस्पर्धी लोकांसोबत टिकून राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच इथे तुम्ही नक्की किती वेळ आपल्या कामाला देता हि एक महत्वाची भूमिका ठरते. याबद्दल बोलताना निखील कामात म्हणतात कि आता जगात भांडवलशाहीचं राज्य सुरु होणार हे सत्य आहे, आणि अश्या जगात जर का आपल्याला आपली जागा निर्माण करायची असेल तर स्पर्धात्मक भूमिका निभावणं भाग आहे. तुम्हाला प्रतिस्पर्धी लोकांशी लढता आलं पाहिजे, त्यात जर का कामाचे तास भूमिका निभावणार असतील तर मग त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलंच पाहिजे.

भावाभावांमध्ये विचार जुळत नाहीत:

निखील कामात यांचा मोठा भाऊ म्हणजेच Zerodha कंपनीचे CEO नितीन कामात यांच्या मतांमध्ये दरी पाहायला मिळते. नितीन कामात यांच्या मते जर का एखादा माणूस एकाच वेळा अनेक कामं करत असेल तर त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या मेंदूवर होऊ शकतो. पण नारायण मूर्ती (70 Hours Work Week) यांच्या मते जर का आपल्याला चीन आणि इतर मोठाल्या देशासोबत स्पर्धा करायची असेल आणि तिकडून राहायचे असेल तर जास्तीत जास्त काम करण्याशिवाय पर्याय नाही.