7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर!! महागाई भत्त्यात तब्बल ‘इतकी’ वाढ होण्याची शक्यता

बिझनेसनामा ऑनलाईन । देशात एकीकडे बेरोजगारी असताना दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी सुरुच आहे. याचे कारण म्हणजे सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये (7th Pay Commission) 50 टक्क्यांनी वाढ करू शकते. येव्हडच नव्हे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8 वा वेतन आयोग लागू करा असा प्रस्तावही एका रेल्वेच्या संस्थेने अर्थमंत्र्यांकडे केला आहे. त्यामुळे येत्या काळात कर्मचाऱ्यांना घसघशीत आर्थिक लाभ होणार असलयाचे दिसत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, RSCWS रेल्वेच्या ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेने भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना आठवा वेतन कायदा लागू करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. यानुसार 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 50 टक्क्यांनी वाढून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. या प्रस्तावावर अर्थमंत्र्यांकडून अजून कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नसलं तरी या चर्चा करूनच मंत्रालयातील अधिकारी या प्रस्तावाबाबत काही निर्णय घेणार आहेत असा दावा सूत्रांनी केलाय.

सध्या महागाई भत्ता 42 टक्के- (7th Pay Commission)

दरम्यान, यापूर्वी मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (7th Pay Commission) शेवटची वाढ करण्यात आली होती. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा 42 टक्के मिळत आहे. येत्या जुलै महिन्यात केंद्र सरकार पुन्हा एकदा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करेल आणि हाच DA मूळ पगाराच्या 46 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यानंतर पुढील वर्षी जानेवारी 2024 मध्ये पुन्हा एकदा डीएमध्ये 4 टक्के वाढ केली जाईल, ती मूळ वेतनाच्या 50 टक्के इतकी असेल असा अंदाज बांधला जात आहे.