7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार? DA मध्ये वाढ होण्याची शक्यता

7th Pay Commission । सणाच्या काळात जर का नोकरदार वर्गाला जर का कोणी खुश करू शकत असेल तर ती म्हणजे पगारवाढ. आता नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे कारण केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे देशातील सुमारे एक कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना फायदा होणार आहे. या लोकांचा आकडा पाहिलात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कि केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये 47.58 लाख लोकांचा समावेश आहे आणि पेन्शन धारकांमध्ये 69.76 लाख लोकांचा समावेश झाला आहे.

कर्मचाऱ्यांसाठी आहे आनंदाची बातमी : 7th Pay Commission

यावर्षी दिवाळी पूर्वी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण या काळात त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. आलेल्या माहितीनुसार हि बातमी दसऱ्यापर्यंत मिळण्याची शक्यता होती मात्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधी हि मोठी भेट देऊ शकतो. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्यात (7th Pay Commission) वर्षातून दोन वेळा सुधारणा करते. ज्याचा लाभ कर्मचार्यांना 1 जानेवारी व 1 जुलै पर्यंत घेता येतो. यंदाच्या वर्षी सरकारने पहिली दुरुस्ती 24 मार्च रोजी केली होती आणि त्यानंतर 1 जानेवारी पासून कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना या वाढीव महागाई भत्याचा फायदा होत आहे. यानंतर केंद्र सरकारकडून 38 टक्के DA 4 टक्क्यांनी वाढवून 42 टक्के करण्यात आला होता.

का होईल पगारवाढ?

महागाईच्या भात्यात वाढ (7th Pay Commission) झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात दिवाळीच्या आधी वाढ होऊ शकते. जर का केंद्र सरकारने महागाईच्या भत्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली तर 42 टक्क्यांवरून वाढून तो 46 टक्के होईल. मात्र सरकारकडून अजूनपर्यंत DAच्या वाढीबाबत कोणतीही बातमी समोर आलेली नाही. सध्या कर्मचारी सरकारकडे DA च्या मागणीची वाढ करत आहेत, कारण हि वाढ त्यांच्या पगार वाढीशी संबंधित असते.

महागाई जेवढी जास्त तेवढा DA वाढवला जातो, ज्यासाठी CPI-IW डेटा स्टॅण्डर्ड म्हणून समजला जातो. जुलै 2023 मध्ये CPI-IW 3.3 अंकांनी वाढून 139.7 वर पोहोचला, वर्षभरापूर्वीचा आकडा तपासून पाहिल्यास यात 0.90 टाक्यांची वाढ झालेली आहे. मात्र ऑगस्टमध्ये यात थोडीशी घसरण पाहायला मिळाली, या आकड्यात 0.5 टाक्यांची घसरण झाल्यामुळे आता हा आकडा 139.2 टक्क्यांवर आहे .सरकारने जर का भत्यात 3 टक्क्यांची वाढ केली तर अठरा हजार रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 7,560 रुपयांवरून वाढून 8,100 रुपयांपर्यंत जाईल. आणि 4 टक्क्यांची वाढ झाली तर भत्ता 8,280 रुपये आणि पगार 690 रुपयांनी वाढेल.