7th Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना येत्या मार्च महिन्यात (2024) महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, DAमध्ये 4 टक्के वाढ होण्याची शक्यता असून त्याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची अपेक्षा बाळगली जाऊ शकते. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे महागाई भत्ते हे कामगारांचा महागाई निर्देशांक (CPI-IW) च्या आधारावर दर महिन्याला निश्चित केले जाते.
सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी: (7th Pay Commission)
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी येत्या काळात येणारा महागाई भत्ता वाढ (Dearness Allowance – DA) वाढ हा 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार ठरलेल्या नियमावलीनुसार केला जाणार आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या DA आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या DR मध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली होती आणि या वाढीनंतर DA 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांवर गेला होता. आता पुढील वाढ कधी होईल आणि त्याचा दर किती असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
देशातील महागाई लक्षात घेऊन सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये DA आणि DR मध्ये सुधारणा करते(7th Pay Commission). याचा निर्णय सरकारकडून मार्च आणि सप्टेंबरमध्ये घेतला जातो आणि वाढीचा अंतिम निर्णय सर्वसाधारणपणे गेल्या 12 महिन्यांच्या सरासरी सर्व-भारत ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) वाढीवर आधारित असतो.