7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना हा सर्वात खास असणार आहे. कारण की, या काळात 1.25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांचा या काळात महागाई भत्ता वाढणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा मधला काळ सर्वात जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तिप्पट बोनस देण्याच्या निर्णयात आहे. केंद्र सरकार DA-DR वाढ, थकबाकी DA थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टरवर कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या बाजूने एक मोठा निर्णय घेणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, यावेळीही महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार तिपटीने वाढ-( 7th Pay Commission)
असे झाल्यास महागाई भत्ता सध्याच्या 42 टक्क्यांहून 46 टक्क्यांपर्यंत वाढेल आणि कर्मचाऱ्यांचा पगार वार्षिक 8,000 रुपयांवरून थेट 27,000 रुपयांपर्यंत वाढू वाढेल. यामुळे आता केंद्र सरकार महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा निर्णय कधी घेईल याकडे सर्वच कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यापूर्वी, केंद्र सरकारने जानेवारी- जून 2020 आणि जानेवारी 2021 साठी DA मध्ये 17 टक्के वाढ केली होती. मात्र त्या काळात कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना पैसे देण्यात आले नाहीत.
आता मात्र कोरोना परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे कर्मचारी संघटना सरकारकडे 18 महिन्यांची डीएची थकबाकी देण्याची मागणी करत आहेत. ही मागणी सरकारने मान्य केल्यास कर्मचाऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. परंतु, यापूर्वी अनेकवेळा केंद्राने डीएची थकबाकी देण्यास नकार दिला आहे.
सध्या सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीवर सरकार गांभीर्याने विचार करत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के दराने फिटमेंट फॅक्टर दिला जात आहे. त्यात 3.68 पट वाढ करण्याची मागणी होत आहे. फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 पर्यंत वाढल्याने किमान मूळ वेतन 18,000 वरून 26,000 रुपये होऊ शकते. केंद्र सरकारने ही मागणी मान्य केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात (7th Pay Commission) प्रचंड वाढ होणार आहे.