7th Pay Commission? महागाई भत्त्यात कधी वाढ होणार? महत्त्वाचे अपडेट्स समोर

बिझनेसनामा ऑनलाईन । मागील अनेक दिवसापासून महागाई भत्यात वाढ (7th Pay Commission) होणार अशी चर्चा रंगत होती. आता सरकार त्यावर शिक्कामोर्तब करणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. सरकारी कर्मचारी याबाबत सकारात्मक आशा व्यक्त करताना दिसत आहेत. महागाई भत्यात 1 कोटीहून अधिक कर्मचारी व पेन्शन धारकांना यामुळे लाभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महागाई भत्ता नेमका कधी वाढणार आणि यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना किती टक्के लाभ होणार आहे हे आज आपण जाणून घेऊ.

महागाई भत्त्यात किती टक्के होणार वाढ?

काही रिपोर्टनुसार महागाई भत्यामध्ये (Dearness Allowance) तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय सरकारचा असल्या कारणाने यापेक्षा अधिक प्रमाणात देखील वाढ होऊ शकते. तीन टक्के वाढ झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना 45 टक्के महागाई भत्ता मिळेल. AICPI-IW च्या डेटा नुसार ही वाढ साधारणपणे 3% पर्यंत असेल.

कधी पासून होऊ शकते वाढ– (7th Pay Commission)

साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये महागाई भत्त्या बाबतची घोषणा केली जाऊ शकते. ही वाढ जुलै 2023 पासून लागू होईल. त्यानुसारच कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्यापासूनची एकत्र महागाई भत्त्याची रक्कम जमा (7th Pay Commission?) करण्यात येईल. असे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी DA मध्ये 4 टक्के वाढ करण्यात आली होती

महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा संशोधित केला जातो. यापूर्वीची DA वाढ 24 मार्च 2023 ला झाली होती. तसंच 1 जानेवारी 2023 पासून ती लागू करण्यात आली होते. केंद्र सरकारने DA ला 4 टक्के वाढवून 38 टक्क्यांवरुन 42 टक्के केलं होतं. आता कर्मचार्यांना दुसऱ्या वाढीच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.

DA म्हणजे काय?

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकार आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा भार कमी करण्यासाठी महागाई भत्ता म्हणजेच DA देते. महागाई भत्ता हा असा पैसा (7th Pay Commission) आहे जो महागाई वाढल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांना जीवन स्तर राखण्यासाठी दिला जातो. त्याची गणना देशाच्या सध्याच्या महागाईनुसार दर 6 महिन्यांनी केली जाते. संबंधित वेतनश्रेणीच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार त्याची गणना केली जाते.