7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी; महागाई भत्त्यासह ‘हा’ भत्तादेखील वाढण्याची शक्यता

7th Pay Commission : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 ते 5 टाक्यांची वाढ होऊ शकते. मीडियावृत्ताच्या अनुसार, या निर्णयामुळे देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. गेल्या वर्षात म्हणजेच 2023 मध्ये सरकारकडून महागाईच्या भत्त्यात 4 टक्यांची वाढ करण्यात आली होती, व 42 टक्के मिळणारा भत्ता 46 टक्क्यांनी मिळायला सुरुवात झाली. मात्र आता बाजारात सुरु असलेल्या चर्चा खऱ्या ठरल्या तर नवीन वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच जानेवारी ते जून या महिन्यांत 4 ते 5 टक्क्यांच्या वाढीसह महागाईचा भत्ता 50-51 टक्क्यांवर पोहोचू शकतो. महागाईच्या भत्त्यात खरोखर वाढ झाली तर परिणामी कर्मचाऱ्यांना मिळणारा HRA वाढले त्यामुळे नवीन वर्षांत महागाई भत्त्याच्या वाढीसह घर भाडे भत्तावाढ देखील पाहायला मिळू शकते.

नवीन वर्षात घर भत्ता देखील वाढणार का? (7th Pay Commission)

सरकार कडून या वर्षी जर का कर्मचाऱ्यांना भत्त्यात वाढ करवून दिली तर घर भत्ता देखील वाढवून मिळण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) महागाईचा भत्ता 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास घरभाड्याच्या भत्त्यात सुधारणा केली जाऊ शकते. घरभाड्याच्या भत्त्यात बदल करताना शहरांची X, Y आणि Z अशी विभागणी केली जाते. आताच्या घडीला X श्रेणी वावरणाऱ्या कर्मचाऱ्यांना 27, Y श्रेणीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 18 आणि Z श्रेणीत राहणाऱ्यांना 9 टक्क्यांनी घरभाडे भत्ता मिळत आहे.

मात्र आता जर का घरभाडे भत्त्यात वाढ झाली तर X श्रेणीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 30 टक्के, Y श्रेणीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 20 टक्के आणि Z टक्के श्रेणीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10 टक्के घरभाडे भत्त्याची सवलत मिळणार आहे. सरकारकडून जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर अश्या सहामाहींमध्ये दोन वेळा वाढीव भात्याची वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना दिली जाते, त्या अनुषंगाने जानेवारी महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता अधिक आहे.