तुमच्या आधार कार्डची मुदत संपली आहे? अशा प्रकारे करा Check

बिसनेसनामा ऑनलाईन । आजकाल आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी महत्त्वाची गोष्ट बनली आहे. अनेकठिकाणी तर आधारकार्ड हेच आपण ओळखपत्र म्हणून दाखवतो. काही सरकारी योजना, बँक KYC , ऍडमिशन, या सर्व गोष्टींसाठी आधार कार्डची गरज असते. आधार कार्ड शिवाय ही कामे होऊच शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? कि तुमचे आधार कार्ड एक्सपायर झालंय कि नाही? अशावेळी तुम्हालाही तुमच्या आधार कार्डची व्हॅलिडीटी चेक करायची असेल तर नेमकं काय करावं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जर तुम्ही तुमचे आधार कार्ड व्हॅलिडीटी चेक केली नसेल तर किंवा तुमचं आधार कार्ड एक्सपायर झालेलं असेल तर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर तुमच्या घरातील पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचं देखील आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. नाहीतर मोठे झाल्यानंतर त्यांचं आधार कार्ड अमान्य करण्यात येऊ शकतं. जर तुम्ही पाच वर्षानंतर मुलांचे आधार कार्ड अपडेट केलं नाही तर आधार कार्ड डिॲक्टिव्ह केले जाते. जर तुम्ही मुलांचे आधार कार्ड पुन्हा ऍक्टिव्ह करू इच्छित असाल तर तुम्हाला बायोमेट्रिक डाटा अपडेट करावा लागतो. त्यानंतर तुमचे आधार कार्ड ऍक्टिव्ह केले जाते. आणि मुलांच्या बाल आधार कार्ड ऐवजी दुसरं आधार कार्ड जारी करण्यात येतं. त्याचबरोबर 15 वर्षानंतर देखील मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे.

असं करा आधार कार्ड व्हेरिफाय

1)सर्वात अगोदर आधार कार्ड च्या अधिकारिक udai.gov.in या वेबसाईटवर जा.
2) ही वेबसाईट ओपन झाल्यावर होम पेजवर जा.
3) त्यानंतर त्या ठिकाणी दिलेल्या आधार सर्विस या ऑप्शन वर क्लिक करा.
4) आधार नंबर व्हेरिफाय करा.
5) यानंतर तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड टाकून आधार कार्ड व्हेरिफाय करा.