Aadhar Card Photo Update : तुम्ही भारतीय आहात ही ओळख पटवून देण्यासाठी आधार कार्ड हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज समजला जातो. आणि आधार कार्डचा वापर पाहिल्यास प्रत्येक भारतीय नागरिकाजवळ हे ओळखपत्र असलेच पाहिजे. या ओळखपत्रावर तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख तसेच इतर महत्त्वाची माहिती सामावलेली असते. केवळ सरकारी कामांसाठीच नाही तर आर्थिक क्षेत्रात देखील आधार कार्ड महत्त्वाची भूमिका बजावत असते. मात्र अनेक वेळा तुम्ही आधार कार्डच्या फोटोवरून उडवली गेलेली खिल्ली ऐकली असेल, म्हणूनच अनेकांना आधार कार्डवर असलेला आपला फोटो आवडत नाही. आणि खास करून हाच फोटो कोणाच्या नजरेस येऊ नये म्हणून आपण वारंवार त्याला जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता आधार कार्डचा फोटो विचित्र आहे म्हणून तुम्हाला संपूर्ण आधार कार्ड लपवून ठेवण्याची गरज नाही, कारण आधार कार्ड वरचा जुना फोटो बदलून घेण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ आहे.
अगदी काही वेळातच तुम्ही नवीन कोरा आणि तुमचा मनपसंत फोटो आधार कार्डशी जोडू शकता. आपण आधार कार्ड तयार केलेली वेळ आणि सध्याची वेळ यात भरपूर मोठा फरक असल्याने या फोटोत बरीच तफावत दिसून येते. हीच बाब लक्षात घेऊन UIDIA ने आधार कार्डचा फोटो बदलण्याची प्रक्रिया अंमलात आणली आहे. मात्र लक्षात घ्या की हे जग जरी ऑनलाइन असले तरीदेखील आधार कार्डचा फोटो बदलण्यासाठी (Aadhar Card Photo Update) तुम्हाला जवळच्या विभागालाच भेट देणे लागणार आहे.
जवळच्या केंद्रावरून बदलू शकता आधार कार्डचा फोटो: (Aadhar Card Photo Update)
भारतीय रहिवाश्याचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड हा सर्वात महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. यावर तुमच्याबद्दल महत्त्वाची माहिती सामावलेली असते, मात्र या माहितीप्रमाणे तुमचा आधार कार्ड फोटो देखील अत्यंत महत्त्वाचा असतो. जर का तुम्हाला हा फोटो बदलायचा असेल तर त्वरित जवळच्या आधार सेंटरला भेट द्या. आता जवळचे आधार कार्ड सेंटर कुठले? हे तपासण्यासाठी तुम्ही UIDIA च्या वेबसाईटवर जाऊन appoinments.uidia.gov.in येथून जवळच्या आधार कार्ड सेंटर बद्दल माहिती मिळवू शकता.
आधार कार्डचा फोटो बदलण्यासाठी तुम्हाला संबंधित एक फॉर्म भरावा लागेल, त्यानंतर तुम्हाला हवा असलेला फोटो या फॉर्म सोबत जोडावा लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन फोटोसह आधार कार्डची डिजिटल कॉपी तुम्ही अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता (Aadhar Card Photo Update). तसेच या संपूर्ण प्रक्रियेसाठी तुम्हाला जवळपास 100 रुपये फी म्हणून भरावे लागतील. फोटो बदलण्याच्या प्रक्रियेचा फॉर्म ऑनलाईन डाउनलोड केला जाऊ शकतो, मात्र तो समाविष्ट करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार कार्ड सेंटरला भेट द्यावी लागेल.
आधार कार्ड डाऊनलोड करण्याचे सोपी प्रक्रिया:
१) सर्वात आधी www.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, आधार कार्ड डाउनलोड या पर्यायाची निवड करा.
२) पुढे नवीन पृष्ठावर आधार क्रमांक अथवा नावनोंदणी आयडी किंवा व्हर्च्युअल आयडी प्रविष्ट करा.
३) यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड सबमिट करावा लागेल आणि पुढे ओटीपी पाठवा (Send OTP) या पर्यायाची निवड करावी लागेल.
४) विभागाकडून आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.
५) नियुक्त केलेल्या ठिकाणी हा OTP प्रविष्ट करा, आता संपूर्ण प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्याने तुम्ही डाउनलोड या पर्यायाची निवड करू शकता.
अशा प्रकारे तुमचे अपडेटेड फोटो असलेले ई-आधार डाउनलोड केले जाईल.