Aadhar Card Rules : तुम्ही भारताचे नागरिक आहेत हि ओळख पटवून देणारा महत्वाचा दस्तऐवज म्हणजे आधार कार्ड, खरोखरीच तुमच्या नागरिकत्वाला या द्वारे आधार दिला जातो. आधार कार्ड संबंधात एक महत्वाची बातमी UIDIA म्हणजेच युनिक आयडेन्टिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, कडून माध्यमांना देण्यात आली आहे. आणि आधार कार्डचे उपयोग लक्ष्यात घेता हि माहिती तुमच्याजवळ पोहोचणं सर्वात महत्वाचं आहे. जसं कि आपल्याला माहिती आहे, आधार कार्ड तयार करताना हाताच्या बोटांचे आणि पंज्याचे ठसे उमटवले जातात. तुमचा वेगळेपणा त्या ठश्यांमधून दिसून येत असतो, पण हाताला बोटं नसतील तर त्या माणसाचं आधार कार्ड बनणाराच नाही का? अपघात किंवा काही नैसर्गिक घटकांमुळे सर्वच माणसं शरीराने परिपूर्ण नसतात, मग अश्यावेळी त्यांच्यासाठी बनवला गेलेला नवीन नियम कोणता हे जाणून घेऊया …
आधार कार्डचा हा नियम बदलला (Aadhar Card Rules):
प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हा महतवाचा दस्तऐवज असतो. बँक, शैक्षणिक संस्था, नोकरीचे ठिकाण, सरकारी योजना ते थेट लग्नाच्या नोंदणी पर्यंत आधार कार्डचे महत्व कमी होत नाही. आता सरकारने आधार कार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेत काही बदल केले आहेत. नवीन बदलांच्या आधारे हाताचे ठसे नसले तरीही आधार कार्ड तयार करता येणं शक्य होणार आहे. या बदलामुळे आधार कार्ड बनवण्याची प्रक्रिया बऱ्याच अर्थी सोपी झाली आहे (Aadhar Card Rules). ठश्यांच्या जागी आता आयरिस स्कॅनची प्रक्रिया अंमलात आणली जाईल. आयरिस आपल्या डोळ्यांचा एक भाग असतो आणि जी लोकं काही अपरिहार्य कारणामुळे हाताचे ठसे देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हा नवीन नियम बनवण्यात आला आहे.
अचानक असा नवीन बदल का?
आपल्या आजूबाजूला अनेक लोकं अशीही असतात ज्यांना काही कारणामुळे शरीराचे भाग गमवावे लागतात, यात अनेकवेळा नैसर्गिक घटकांचाही समावेश होत असतो. केरळमधून अशीच एक घटना राजीव चंद्रशेखर (इलेक्रॉनिक्स आणि आयटी- राज्य) केंद्र मंत्र्यांच्या पाहण्यात आली होती आणि त्यानंतर सरकारने जनहितार्थ हे मोठे पाऊल उचलले आहे. देशातील कोणताही माणूस आता शारीरिक अपूर्णतेमुळे आधार कार्ड सारख्या महत्वाच्या ओळखपत्राला मुकणार नाही. डोळ्यांचा विकार असलेला माणूस हाताच्या ठश्यांच्या मदतीने तर, हात परिपूर्ण नसलेला माणूस डोळ्यांच्या मदतीने आधार कार्ड तयार करून घेऊ शकणार आहे.
तसेच जर का एखादा व्यक्ती दोन्ही प्रकारे बायोमेट्रिक्स नोंदवण्यात असमर्थ ठरत असेल तर अश्या व्यक्तीलाही आधार कार्डची सुविधा मिळणार आहे. अश्या दुर्मिळ प्रसंगांमध्ये माणूस त्याचे नाव, राहण्याच्या पत्ता, लिंग, जन्म तारीख इत्यादी घटकांची माहिती देऊन आधार कार्ड तयार करून घेऊ शकतो.