Aadhar Card: आनंदाची बातमी; आधार धारकांसाठी UIDAI ची मोठी घोषणा

Aadhar Card: तुमचे आधार कार्ड तयार होऊन 10 वर्ष उलटून गेली आहेत का? हो तर हे तुमच्यासाठी फारच धोक्याचं ठरू शकतं. गेल्या अनेक दिवसांपासून सरकार आधार कार्ड अपडेट करण्याबाबत सर्वांना विनंती करीत आहे आणि आज समोर आलेली महत्वाची बातमी सांगते की आधार कार्ड अपडेटींगची मुदत वाढवली असून ही प्रक्रिया जून 14, 2024 पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते. याअगोदर सरकारने मार्च 14, 2024 अशी अंतिम तारीख दिली होती.

आधार कार्ड अपडेटींगची मुदत वाढली: (Aadhar Card)

आधार कार्ड ही सरकारी खात्यात असलेली आपली ओळख आहे, आधार कार्ड शिवाय सरकारीच काय तर इतर कामं सुद्धा अडकून पडू शकतात. महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आधार कार्ड अपडेट करून घेण्याची मुदत आता केंद्र सरकारकडून वाढवून देण्यात आली आहे. काहीही कारणास्तव जर का याआधी तुम्ही आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर यावेळची संधी गमावून चालणार नाही.

मोफत अपडेट करून मिळेल आधार कार्ड:

Unique Identification Authority Of India (UIDAI) ने आधाराधारकांना मोठा दिलासा दिला आहे. आता तुम्ही तुमची आधार माहिती 14 जून 2024 पर्यंत पूर्णपणे विनामूल्य Update करू शकता(Aadhar Card). अगोदर ही अंतिम तारीख 14 मार्च 2024 होती, पण UIDAI ने ही मुदत वाढवली आहे. यासाठी तुम्ही आधार पोर्टल (myAadhaar) वर तुम्ही तुमचे आधार कार्ड विनामूल्य Update करू शकता. पण जर तुम्ही एखाद्या आधार केंद्रावर जाणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 50 रुपये मोजावे लागतील.