Aadhar Card Update : प्रत्येक भारतीयांच्या दृष्टीने आधार कार्ड हा सर्वात महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. तुम्ही भारतीय नागरिक आहात याची ओळख ठामपणे पटवून देणारा हा पुरावा आहे असेही आपण म्हणू शकतो. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारकडून आधार कार्डच्या बाबतीत एक महत्त्वाची बातमी जारी करण्यात आली होती, काही अपरिहार्य कारणास्तव ज्या मंडळींना हाताचे ठसे उमटवता येत नाहीत त्यांच्यासाठी आयरिस स्कॅनच्या मदतीने आधार कार्ड तयार करण्याची नवीन पद्धत अंमलात आणली गेली आहे. भारतातील कुठलाही नागरिक आधार कार्ड सारख्या मूलभूत हक्काला मुकु नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. यानंतर आज पुन्हा एकदा आधार कार्डच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली, जी आधार कार्डच्या अपडेट बद्दल अधिक माहिती देते. तुमचे आधार कार्ड जर का दहा वर्ष जुने झाले असेल तर लवकरात लवकर अपडेट करून घेणे महत्त्वाचे आहे.
तुमचेही आधार कार्ड 10 वर्ष जुने आहे का?:
आधार कार्ड सारख्या महत्त्वाच्या दस्तऐवजाच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नये. यापूर्वी भारत सरकारद्वारे जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबर 2023 अशी अंतिम तारीख देण्यात आली होती, मात्र आता यात थोडी सवलत मिळणार असून पुढील तीन महिन्यांसाठी तुम्हाला मुदत वाढ करवून देण्यात आली आहे. म्हणूनच आता तुम्ही मार्च 2024 पर्यंत आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकता. 2023 या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आधार कार्ड अपडेट करून घेणे हे प्रत्येक नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचे काम असणार आहे. भारत सरकारकडून तीन महिन्यांसाठी आधार कार्डचा अपडेट करण्यासाठी देण्यात आलेली सवलत ही आधीप्रमाणेच मोफत असेल त्यामुळे आता वेळ न दवडता या सवलतीचा फायदा करून घ्या (Aadhar Card Update).
आधार कार्ड मोफत अपडेट करून घ्या (Aadhar Card Update):
सरकारच्या नवीन आदेशानुसार तुम्ही 14 मार्च 2024 पर्यंत अगदी मोफत दरात आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकता. यासाठी कुठे बाहेर न जाता my aadhar portal या अधिकृत वेबसाईटचा वापर करून काही संबंधित दस्ताऐवज पुरवून आधार कार्ड अपडेट करता येते. पण जर का तुम्ही ऑफलाइन मार्गाने आधार कार्ड अपडेट करणार असाल तर यासाठी 25 रुपयांचे शुल्क आकारले जाईल.
आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे:
सर्वात आधी myaadhar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर आवश्यक असलेले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून सबमिट करा.
आता तुमच्या रेजिस्टरड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, जो क्रमांक स्क्रीनवर दिलेल्या पर्यायात समाविष्ट करावा लागेल आणि मग कार्ड अपलोडची प्रक्रिया सुरू होईल.
पुढील टप्प्यांमध्ये तुम्हाला राहत्या पत्त्याबद्दल माहिती देणारा एक दस्ताऐवज जोडावा लागेल, ज्यानंतर 14 अंकी अपडेट रिक्वेस्ट (Update Request) नंबर पाठवला जाईल
लक्षात घ्या की आधार कार्ड हा भारत सरकार कडून जारी करण्यात आलेला एक सर्वात महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. आधार कार्ड शिवाय कुठल्याच सरकारी कार्यालयात तुमचे काम पूर्ण होऊ शकणार नाही, सरकारी कार्यालयेच नाही तर इतर महत्त्वाच्या ठिकाणी देखील तुम्हाला गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच तुमचे आधार कार्ड जर का दहा वर्ष जुने असेल तर लवकरात लवकर ते अपडेट (Aadhar Card Update) करून घ्या.