Aadhar Card Update: आपल्या देशात आधार कार्ड (Aadhar Card) हे महत्वपूर्ण कागदपत्रांपैकी एक आहे. अनेक सरकारी तसेच बाह्य कामांसाठी इतर कोणत्याही कागदपत्रांपेक्षा आधार कार्ड हेच सर्वात महत्वाचं समजलं जातं. आणि एवढा महत्वाचा दस्ताऐवज जर का आउटडेटेड असेल तर सगळीच कामं अडकून पडतील, कारण यात तुमच्या नावापासून सगळीच माहिती सामावलेली असते. त्यामुळे वेळोवेळी आधार कार्ड अपडेट करण गरजेचं आहे. जुन्या आधार कार्डमुळे ऑनलाईन फसवणूकीची भीती असते त्यामुळे भारत सरकारकडून आता 10 वर्ष जुन्या आधार कार्डनां अपडेट करवून घेण्याचा आदेश जारी केला आहे.
आधार कार्ड अपडेट करून घ्या: (Aadhar Card Update)
भारत सरकारकडून जारी केलेला महत्वाचा दस्ताऐवज म्हणजे आधार कार्ड. आधार कार्डवरूनच तुमची अनेक सरकारी तसेच इतर कामं पूर्ण होत असतात. एखाद्या माणसाची ओळख पटण्यासाठी हे कागदपत्र सगळ्याच ठिकाणी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलं जातं. त्यामुळे भारत सरकारकडून जारी केलेल्या या आधार कार्डला वेळेतच अपडेट करून घ्यावं. सध्या सरकार हे काम मोफत करवून देत आहे, जर का तुमच्या घरात कुणाचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल तर या मोफत योजनेचा वेळेतच लाभ घ्या.
आधार कार्ड कधीपर्यंत अपडेट करावं?
आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर आहे. या संदर्भात सरकारकडून तुमच्या रजिस्टरड मोबाईल नंबरवर एक संदेश येईल, 10 वर्ष जुनं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी UIDAI या अधिकृत साईटला भेट द्या. सर्व सरकारी प्रक्रियेसाठी इथे कोणतेही मूल्य आकारले जाणार नाही. याआधी UIDAI च्या मदतीने डेमोग्राफिक डेटा, बायोमेट्रिक अपडेट, आधार डाउनलोड यांसारख्या प्रक्रीयेंवर काही प्रमाणात शुल्क आकारले जायचे.
सध्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुमच्यासमोर दोन पर्याय उपलब्ध आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन. मात्र ऑनलाईन प्रक्रियेत सगळीच कामं पूर्ण होणार नाही त्यामुळे CSC केंद्राला भेट देऊन आधार कार्ड अपडेट (Aadhar Card Update) करून घेणं कधीही सोयीस्कर ठरेल. ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करून जास्तीत जास्त तुम्ही एक अपोईनमेंट बुक करू शकता. आधार कार्ड हा खरोखरच एक महत्वाचा दस्ताऐवज असल्यामुळे या कामात उशीर करू नका आणि येणाऱ्या अडचणींपासून सावध राहा.