Adani Ambani Collaboration: भारतीय उद्योग जगतातील दोन दिग्गज खेळाडू म्हणजेच मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यातील स्पर्धेची नेमहीच जगभरात चर्चा केली जाते. रिलायन्स आणि अदानी समूह अनेक क्षेत्रात एकमेकांशी टक्कर देतात. पण, अलीकडेच घडलेली एक घटना सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी आहे. कदाचित ही बातमी वाचून तुम्ही देखील चकित व्हाल पण पहिल्यांदाच अंबानी आणि अदानी यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
अदानी-अंबानी एकत्र येणार? (Adani Ambani Collaboration)
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने गौतम अडानींच्या अदानी पावर कंपनीतील 26 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. मध्य प्रदेशातील एका ऊर्जा प्रकल्पात रिलायन्सने अदानी पावरमधील हिस्सेदारी खरेदी केली आहे आणि या माहितीनुसार हे दोन्ही दिग्गज उद्योगपती एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल. या कराराअंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीज अदानी पावरच्या ‘महान एनर्जेन लिमिटेड’ नावाच्या उपकंपनीत 500 मेगावॅटच्या वीज खरेदीसाठी 50 कोटी रुपये गुंतवणार आहे. रिलायन्सला या प्रकल्पातून मिळणारी वीज त्यांच्या गुजरातमधील जामनगर येथील रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी वापरण्यात येणार आहे.
या कराराचे अनेक फायदे आहेत. रिलायन्सला स्वतःच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी एका विश्वासार्ह स्त्रोतातून वीज मिळेल. तर अदानी पावरला रिलायन्स सारख्या मोठ्या कंपनीसोबत काम करण्याची आणि गुंतवणुकीची संधी मिळेल. या करारामागे अनेक कारणे असू शकतात. एका बाजूला अंबानी आणि अडानी यांच्यातील स्पर्धा कमी होण्याची शक्यता आहे(Adani Ambani Collaboration). दुसरीकडे दोन्ही कंपन्यांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. या कराराचा भारतीय उद्योग जगावर काय परिणाम होईल हे अद्याप सांगणे कठीण आहे. पण, हे निश्चित आहे की हा करार भारतीय ऊर्जा क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.