Adani Green Energy Park : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले भारतातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणजेच गौतम अदानी. हिंडेनबर्गच्या एका अहवालामुळे गौतम अदानी यांची सारी दुनियाच बदलून गेली होती. त्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली, मार्केट कॅपही उतरला तसेच अनेक गुंतवणूकदारांनी समूहाला कायमचा रामराम ठोकला.भारतात अजूनही सेबीकडून सादर प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र अमेरिका सरकारच्या निकालामुळे समूहासाठी दिवस पालटू लागले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनीचे शेअर्स तेजीत आहेत, खास करून त्याच्या ग्रीन एनर्जी शेअरमध्ये प्रचंड वाढ होताना दिसते. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या पाच दिवसांत 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली होती आणि आता अदानी समूह आणि त्यांची ग्रीन एनर्जी ह्या कंपनीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अदानी समूह गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क उभारणार आहे.
गुजरातमधील कच्छ भागात उभारणार ग्रीन एनर्जी पार्क: Adani Green Energy Park
गौतम अदानी हे अदानी समूहाचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली समूह गुजरातमधल्या कच्छ या भागात नवीन ग्रीन एनर्जी पार्क (Adani Green Energy Park) बनवणार आहे. हा पार्क जगातील सर्वात मोठा एनर्जी पार्क असणार आहे. सदर प्रकल्पाविषयी माहिती देताना गौतम अदानी म्हणालेत की जगातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणाऱ्या या पार्कचा एकूण आकार हा 726 चौरस किलोमीटर एवढा मोठा असेल. आणि या प्रकल्पाचा वापर करून 30GW विज निर्माण केली जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे का हा भव्य दिव्य पार्क थेट अंतराळातूनही दिसणार आहे, आणि यावरूनच त्यांच्या असीमतेची ओळख पटते.
गौतम अदानी आणि समूहाकडून उचलण्यात आलेलं हे पाऊल देशातील ऊर्जा क्षेत्राला बढावा देणार आहे. आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपण हातभार लावू शकतोय म्हणून गौतम अदानी यांना त्यांच्या कंपनीचा भरपूरअभिमान वाटतोय. या प्रकल्पामधून (Adani Green Energy Park) कंपनी देशातील 2 कोटी पेक्षा अधिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार आहे. शिवाय समूहाकडून मुंद्रा येथून केवळ 150 किमी अंतरावर असलेल्या प्रदेशात जगातील सर्वात मोठी सौर आणि पावन ऊर्जा निर्माण करणारी इकोसिस्टम तयार केली जाईल. हा प्रकल्प जर का यशस्वी झाला तर भारताची हरित ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता भरपूर वाढेल. COP26 या परिषदेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केला होता कि वर्ष 2070 पर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय सध्या करणार आहे.