Adani Green Share मध्ये 899 टक्क्यांनी झाली वाढ; ‘हा’ करार ठरला फायदेशीर

Adani Green Share । अदानी समूहाचे शेअर्स खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असते. आता देखील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आल्यामुळे हे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्सची किंमत तब्बल 899 टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे अदानी समूहातील सर्वात स्वस्त शेअर असणाऱ्या अदानी पावर शेअर्समध्ये देखील 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर कंपनीचे शेअर्स 261.70 रुपयांवर बंद झाले आहेत.

शेअर्समध्ये वाढ होण्याचे हे आहे कारण – (Adani Green Share)

गेल्या काही दिवसांपूर्वी गौतम अदानी यांनी माहिती दिली होती की, गुजरातमधील खवडा येथे जगातील सर्वात मोठे हायब्रीड ऊर्जा पार्क उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अदानी यांनी दिलेल्या माहितीनंतरच, ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्सने (Adani Green Share) 899 टक्क्यांचा उच्चांक गाठला आहे. सध्या अदानी समूहाच्या एकूण सात कंपन्या शेअर बाजारात धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यामध्ये अदानी समूहाने टेकओव्हर केलेल्या अंबुजा सिमेंट, एसीसी, एनडीटीव्ही यांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर, अदानी पॉवरच्या शेअर्सने गेल्या पाच वर्षांत जवळपास 899% परतावा दिला आहे. या दरम्यान त्याची किंमत 26 रुपयांवरून 26170 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच यामध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आली आहे. अदानी समूहाच्या या शेअर्समध्येही मोठी तेजी दिसून आली आहे.

नुकतीच, अदानी समूहाच्या ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला, अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स 2 टक्क्यांवर बंद झाले आहेत. दरम्यान, अदानी समूहाचे शेअर्स वाढण्यामागील कारण समूहाने आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेले करार ठरत आहेत. या करारांमुळेच अदानी समूहाचे शेअर्स वाढीला लागले आहेत.

गेल्या रविवारी फर्म बेन कॅपिटलने अदानी समूहाची वित्त कंपनी असलेल्या कॅपिटल अदानी हाऊसिंगमधील 90 टक्के हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या करारांतर्गत बेन कॅपिटल अध्यक्ष गौतम अदानी यांच्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीमधील 90 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. महत्वाचे म्हणजे, बेन कॅपिटलने हिस्सा विकत घेतल्यानंतर अदानी समूह या कंपनीत 120 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे देखील समोर आले आहे.