Adani Group Investment : हिंडेनबर्गच्या जाळातून बाहेर पडणाऱ्या गौतम अदानी यांच्या समूहाने फुलटॉसवर सिक्सर मारायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी अदानी समूह संकटांच्या कचाट्यात सापडला होता. मात्र हिंडेनबर्ग आणि समूहामध्ये सुरु असलेली हि लढाई अमेरिकेकडून क्लीन चिट मिळाल्यामुळे बऱ्यापैकी समूहाच्या बाजूने वळली आहे. समूहाचे पारडे आता बऱ्याच अंशी मजबूत झाल्यासारखी स्थिती आहे. तुम्हाला माहिती आहे का पुन्हा एकदा बाजारात प्रवेश केलेल्या अदानी समूहाने पुढील 10 वर्षात 7 लाख कोटी रुपयांचे भांडवली खर्चाचे (Capital expenditure) नियोजन केले आहे. गौतम अदानी यांनी स्वतः X च्या माध्यमातून हि माहिती दिली आहे. अदानी समूहाच्या या नियोजनामुळे येणाऱ्या काळात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी नक्कीच त्यांना मदत होणार आहे.
अदानी समूह कोणकोणत्या क्षेत्रात करणार गुंतवणूक- Adani Group Investment
अदानी समूहाच्या अंतर्गत काम करणारी कंपनी म्हणजे अदानी सोल्युशन्स. देशातील सर्वात मोठी पायाभूत सुविधा निर्माण करणारी कंपनी म्हणून तिचे स्थान बळकट व्हावे यासाठी पुढील 10 वर्षात समूह 7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक (Adani Group Investment) करण्याची योजना आखात आहे. समूहाची प्रमुख कंपनी म्हणेजच अदानी एन्टरप्रायसिस. हि कंपनी खाण काम, विमानतळ, सौरक्षण आणि एरोस्पेस, सौर उत्पादन, रस्ते, मेट्रो इत्यादी क्षेत्रांमध्ये कार्यरत असते. तसेच सध्या त्यांनी हरित ऊर्जेच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे.
वर्ष 2025 पर्यंत देशातील एकमेव कार्बन न्यूट्रल पोर्ट ऑपरेशन म्हणून सर्वात उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करून समूहा समोर आत्तासाठी 2040 पर्यंत APSEZ नेट शून्य उत्सर्जन करून क्रेनचे विद्युतीकरण तसेच सर्व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये परिवर्तन करणं असा प्रमुख उद्देश असणार आहे. याशिवाय समूहाकडून लवकरच 1000 MW ची कॅप्टिव्ह रिन्यूएबल क्षमता विकसित केली जाईल असे गौतम अदानी यांनी स्वतः स्पष्ट केले आहे. याशिवाय अदानी समूह टोटल गॅस लिमिटेड या कंपनीच्या अंतर्गत देशाच्या शहरी भागांमध्ये CNG, नॅचरल गॅस, कॉम्प्रेसड बायोगॅस तसेच इ-मोबिलिटीच्या देशाने सकारात्मक वाटचाल करत आहे.
बनवणार जगातील सर्वात मोठा हरित ऊर्जा पार्क:
सध्या अदानी समूह काम करत असलेला प्रकल्प त्यांना उच्च स्थरावर नेऊन ठेऊ शकतो. कारण गुजरातच्या वाळवंटात कच्छमध्ये सुरु असलेला हरित ऊर्जेचा हा प्रकल्प देशातीलच नाही तर जगभरतील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. वाळवंटात एकूण 726 चौरस किलोमीटर पसरलेल्या परिसरात या प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे, आणि तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण हा प्रकल्प एकदाका पूर्ण झाला कि आकाशातूनही याचे चित्र डोळ्यांनी पाहत येईल (Adani Group Investment) या सुरु होणाऱ्या प्रकल्पाच्या आधारे दोन कोटी पेक्षा अधिक घरांमध्ये वीज पुरवली जाईल यासाठी समूह 30 GW ची वीज निर्मिती करेल, याशिवाय मुद्रा इथंही एका प्रकल्पावर अदानी समूह कार्यरत आहे. अशी माहिती अदानी समूहाकडून माध्यमांना मिळाली आहे.