Adani Group Investment : अमेरिकन कंपनी हिंडेनबर्गचा सामना केल्यानंतर आता अदानी समूहाची गाडी सुसाट वेगाने सुरु झाली आहे, गुंतवणुकीच्या क्षेत्रात बाजी मारत अदानी समूह पुन्हा आपले जुने वैभव परत मिळवण्याच्या मार्गावर आहे. आजच समोर आलेल्या माहितीनुसार अदानी समूहाने तेलंगणात 12,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली, तसेच महाराष्ट्रात देखील समूहाकडून 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. येणाऱ्या 10 वर्षांत समूहाला महाराष्ट्र तसेच तेलंगणामध्ये Data Center आणि इतर प्रकल्प उभारायचे आहेत आणि म्हणूनच यांसाठी समूह 62,400 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे.
अदानी समूहाचे दोन मोठ्या गुंतवणूका : (Adani Group Investment)
महाराष्ट्रात येत्या 10 वर्षात अदानी समूह 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत Gigawatt क्षमता असणारे डेटा सेंटर उभारणार आहे. संघूहाच्या अंतर्गत येणारी अदानी इंटरप्रायसिस(Adani Enterprises) ही कंपनी संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी सांभाळेल. माध्यमांना मिळलेल्या माहितीनुसार हे डेटा सेंटर मुंबई, नवी मुंबई किंवा पुण्यात उभे राहण्याची शक्यता आहे. WEF च्या बैठकीदरम्यान अदानी समूहाचे चेअरमेन गौतम अदानी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादर करारावर स्वाक्षरी केली होती. समूहाने दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पामुळे राज्याला अधिकाधिक हरित ऊर्जा प्रदान केली जाईल, तसेच आजूबाजूच्या 20 हजार लोकांना यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
केवळ महाराष्ट्राचं नाही तर अदानी समूह काँग्रेस शासित प्रदेश म्हणजेच तेलंगाणातही एक मोठा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. येणाऱ्या पाच ते सहा वर्षात समूह 500 Gigawatt ची क्षमता असणारा प्रकल्प उभारणार असून यात समूहाकडून तब्बल 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे तेलंगणात स्वच ऊर्जा प्रकल्प आणि अंबुजा सिमेंटचा कारखाना उभारण्यात येईल आणि यामुळे आजूबाजूच्या 600 लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. शिवाय संशोधन, विकास, उत्पादन, द्रोण आणि क्षेपणास्त्रविरोधी प्रणालींचे एकत्रीकरण करून समूहाकडून तेलंगणात येत्या 10 वर्षांत 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल(Adani Group Investment). याचाच अर्थ असा कि अदानी समूह तेलंगणामध्ये 12,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात सज्ज आहे, आणि संपूर्ण करारावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन्त रेड्डी आणि समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्याकडून स्वाक्षरी करण्यात आली आहे.