बिझनेसनामा ऑनलाईन । देशातील सर्वात नावाजलेली कंपनी अदानी समूहाला (Adani Group) गणपतीचा आशीर्वाद मिळाला आहे. या कंपनीला येणाऱ्या दिवसांत मोठा फायदा होणार आहे कारण महाराष्ट्र राज्य सरकार कडून त्यांना मोठा प्रकल्प देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शिंदे सरकारने अदानी समूहाला स्मार्ट मीटर (Smart Meter) बसवण्याचे कंत्राट दिले आहे.
13,888 कोटी रुपयांचे कंत्राट – Adani Group
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) कडून स्मार्ट मीटर बसवण्याची एकूण 6 प्रोजेक्ट्स देण्यात आले आहेत, ज्यातील 2 प्रोजेक्ट्स अदानी समूहाकडे( Adani Groups)आहेत. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपनीकडून 13,888 कोटी रुपयांचे दोन मीटर बसवण्याचे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत. सरकारकडून मिळालेले हे प्रोजेक्ट्स भांडूप, कल्याण आणि कोकण, बारामती आणि पुणे या ठिकाणी बसवायचे आहेत. ज्यातील एक 63.44 लाख मीटर व दुसरा 52.45 लाख मीटर बसवण्याचा प्रकल्प आहे.
मात्र अदानी समूहाची यावर प्रतिक्रिया नाही–
अदानी समूहाशिवाय एनसीसी, जीनस याप्रमाणे अनेक कंपन्यांना हे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत. एनसीसीला नाशिक आणि जळगाव येथे 28.86 लाख मीटर तर नांदेड आणि संभाजीनगरात 27.77 लाख मीटरांचे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत.मात्र अदानी समूहाकडून( Adani Groups) या विषयी कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. हल्लीच या समूहाला मुंबईत स्मार्ट मीटर बसवण्याचे 1,000 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मिळाले होते. दरम्यान, गौतम अदानी यांनी मुंबईच्या झोपडपट्टीनचे पुनर्वसन करण्यासाठी प्रधीकार्णासोबत संयुक्त उपक्रम सुरु केल आहे. या उप्रकामातून धारावीच्या विकासाचे काम केले जाणार आहे, धारावीचा प्रकल्प कायदेशीर वादात अडकलेला असताना अदानी समूहाने हे महत्वाचे पाउल उचलले आहे.