Share Market : अदानी समूहाची रॉकेट भरारी!! सर्व 10 कंपन्यांचे शेअर्स वधारले

बिझनेसनामा ऑनलाईन । भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला अदानी समूह देशातील र्व्यवस्थेची चक्रे एकहाती फिरवून ते गतिमान करण्यास वा संथगतीने फिरवण्याची तयारी ठेवतो हे आपण सर्व जाणतोच. जेव्हा अदानी समूहाचे शेअर्स बाजारात घसरतात तेव्हा शेअर बाजारही घसरतो आणि जेव्हा ते वधारतात तेव्हा भारतीय शेअर बाजारही तेजीत असतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अगदी कालही अदानी समूहाचे सात शेअरचे दर घसरताना शेअर बाजारात घसरण सुरू होती पण मग अदानी समूहाचे सर्व शेअर्स उच्च पातळीवर व्यवहार करू लागताच शेअर बाजारात तेजी आली.

अदानीच्या सर्व 10 कंपन्यांचे शेअर्सचे भाव काल वधारले होते. त्यातील विल्मारचा शेअर सात हा टक्क्यांनी वाढला होता . सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ञ समितीचा अहवाल समोर आल्यानंतर शुक्रवारी अदानी समूहाच्या सर्व 10 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स उच्च पातळीवर बंद झाले. काल दुपारनंतर अदानी विल्मरचे शेअर्स सात टक्क्यांपर्यंत वाढले. सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीने म्हटले आहे की, अदानी समूहाच्या शेअर्सच्या किंमतीत हेराफेरीचा कोणताही पुरावा त्यांना सापडला नाही. तसेच, अदानी समूहाच्या कंपन्यांमधील विदेशी कंपन्यांनी केलेल्या गुंतवणुकीतील कथित उल्लंघनाबाबत सेबीच्या स्वतंत्र तपासात काहीही आढळून आलेले नाही.

परिणामी अदानी हि बाब अदानी उद्योग समूहाच्या पथ्यावर पडली अन मग अदानी शेअर्सनी दिवस अखेरपर्यंत आपली यशस्वी घोडदौड सुरु ठेवली BSE वर तर अदानी विल्मरचे शेअर्स ६.८५ टक्क्यांपर्यंत वाढले होते.तर अदानी पॉवरचा शेअर 4.93 टक्के, अदानी ट्रान्समिशनचा शेअर 4.62 टक्के, अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 4.18 टक्के, अदानी एंटरप्रायझेसचा शेअर्स 3.65 टक्के, अदानी पोर्टचा शेअर 3.65 टक्के, NDTVचा शेअर 3.53 टक्के आणि अदानी टोटल गॅसचा शेअर 350 टक्के वाढून शेअर्समधील तेजी नोंदवत होता.