Adani Groups : अदानींना आणखी एक झटका? मुंबई विमानतळाच्या खात्यांची चौकशी सुरु

Adani Groups :गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालीलअदानी समूहाचा व्यवसाय सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. हिडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या संकटांची शृंखला सुरु झाली आहे. आता समूहाकडून नवीन आलेल्या बातमीनुसार कोरपोरेट व्यवहार मंत्रालयाकडून अदानी समूहाच्या दोन विमानतळाच्या खात्याची चौकशी सुरु झाली आहे. अदानी समूहासाठी हि नवीन संकटाची चाहूल तर नाहीये हा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे.

अदानी समूहाच्या समोर नवीन संकट: Adani Groups

सध्या कोरपोरेट व्यवहार मंत्रालयाकडून अदानी समूहाच्या प्रमुख खात्याची म्हणजेच अदानी एन्टरप्राइझीसची चौकशी सुरु आहे. या तपासामध्ये समूहाच्या दोन विमानतळ खात्यांची तपासणी सुरु झाली आहे. मंत्रालयाने मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळाची आर्थिक वर्ष 2017-18 ते आर्थिक वर्ष 2021-22 पर्यंत सर्व कागदपत्रांची मागणी केली आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात मंत्रालयाकडून अदानी समूहाची चौकशी करण्यात आली होती. या सर्व प्रकरणाबदल अद्याप अदानी समूहाने (Adani Groups) कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अदानी समूहाकडे एकूण सात विमानतळे आहेत. यातील सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की समूहाकडून वर्ष 2019 मध्ये विकत घेण्यात आले होते. यापूर्वीची सहा विमानतळे अदानी समूहाला सरकार कडून खासगीकरणासाठी मिळाली होती.

हिडेनबर्गच्या अहवालाचा परिणाम:

काही दिवसांपूर्वी शॉर्ट सेलर हिडेनबर्गच्या एका अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्सवर परिणाम झाला होता. या कंपनीकडून स्टोक मेनिप्युलेशन(Stock Manipulation ) आणि अकाऊन्टीग फ्रोडचे(Account Fraud) आरोप केले होते. अदानी समूहाने जरी हे आरोप पूर्णपणे फेटाळले असले तरीही त्याचा वाईट परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झालेला उघडपणे दिसून आला. सर्वोच्य न्यायालयात हिडेनबर्ग आणि अदानी समूहाच्या (Adani Groups) मामल्यावर कारवाई सुरु आहे, याचाच परिमाण काल कंपनीच्या शेअर्सवर दिसून आला. अदानी इंटरप्राइसचे शेअर्स काल 3 टक्यांपेक्षा जास्ती घसरले. तसेच अदानी पॉवर्स आणि अदानी टोटल गेस या कंपन्यांचे शेअर्स 1 ते 1.25 टक्क्यांनी घसरले होते.