Adani Groups आणि इस्रायल मध्ये झालाय मोठा करार; येतील का समूहासाठी अच्छे दिन?

Adani Groups | इस्रायेल आणि हमास यांच्यात चाललेल्या युद्धाचा भीषण परिणाम पूर्ण जगने भोगला. कित्येक निष्पाप जीवांनी त्यांचे प्राण गमावले आणि अनेक कंपन्यांनी त्यांची कार्यालये सुरक्षित ठिकाणी हलवली. या युद्धाच्या परिणामी अनेक व्यवसाय ठप्प झाले, अनेकांचे शेअर्स उतरले. त्यामुळे एकंदरीत पाहायला गेल्यास या युद्धाने जीवांचे, पर्यावरणाचे, आर्थिक व्यवस्थांचे नुकसान केले आहे. मात्र यात जर का आपल्या देशातील कोणी सुखी उद्योगपती असतील तर ते म्हणजे गौतम अदानी (Adani Groups). हिंडनबर्गचा अहवालामुळे या कंपनीच्या शेअर्सवर वाईट परिणाम झाला होता, किंबहुना याच अहवालानंतर कंपनीच्या समोर अनेक संकटं येऊन उभी राहिली होती. मात्र आता अदानी समूहासाठी एक आशेचा किरण उगवला आहे, तो कोणता हे जाणून घेऊया…

अदानी समूहासाठी अच्छे दिन? (Adani Groups)

गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या संकटांना तोंड देणाऱ्या अदानी समूहासाठी कदाचित चांगल्या दिवसांची सुरुवात झाली आहे. इस्रायेल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू असताना गौतम अदानी यांनी इजरायली डिफेंस इलेक्ट्रॉनिक्स सोबत एक महत्वाचा करार केला आहे. हा करार डिफेन्स क्षेत्रातील असून यामुळे समूहाला बाजारात मोठ्या प्रमाणत पकड मजबूत करायला मदत होणार आहे.

अदानी एंटरप्रायझेसने इस्रायलच्या एल्बिट सिस्टम्स लिमिटेडसोबत हा करार केलेला असून. यानंतर इस्त्रायली कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या स्टेप-डाउन उपकंपनीमध्ये 44 टक्के भागीदारी सांभाळणार आहे आणि यानंतर कंपनीतील अदानीची हिस्सेदारी 56 टक्के कायम राहील. या दोन्ही कंपन्या आता संरक्षण अनुप्रयोगांसाठी तंत्रज्ञान आणि प्रणाली विकासावर एकत्र काम करतील. अदानी समूहाच्या (Adani Groups) मालकीची उपकंपनी अदानी डिफेन्स सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ADSTL) ने 20 नोव्हेंबर रोजी ESL सोबत शेअरहोल्डर्स एग्रीमेंट आणि शेअर सबस्क्रिप्शन करारावर स्वाक्षरी करून कराराला मान्यता दिली.