Adani Groups Investigation : मागचे काही दिवस हे अदानी समूहासाठी काही फारसे चागले नव्हते. हिडनबर्गच्या अहवालानंतर या कंपनीच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. मधल्या काही दिवसांमध्ये थोडीशी सुधारणा होण्याची चिन्ह दिसत असताना आता पुन्हा एकदा गौतम अदानी यांच्या कंपनीसाठी अजून एक धोक्याची घंटा म्हणावी अशी बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी सर्वात पहिल्या स्थावर असलेल्या गौतम अदानी यांच्या कंपनीचे शेअर्स देखील अधून मधून घसरताना दिसतात. आता काय आहे हि नवीन बातमी जिच्यामुळे अदानी समूह पुन्हा धोक्यात येणार आहे हे जाणून घेऊया.
केंद्र सरकार करणार अदानी समूहाची चौकशी – (Adani Groups Investigation)
यंदाच्या आर्थिक वर्षात अदानी समूहासाठी अडचणी काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाही. समोर आलेली बातमी सांगते कि केंद्र सरकार कोळसा आयात प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू करू शकते. म्हणजेच तपास यंत्रणांकडून कोळसा आयातीच्या किमती वाढवल्या प्रकरणाची पुन्हा चौकशी (Adani Groups Investigation) सुरु केली जाऊ शकते. या संदर्भात कागदपत्रे सिंगापूरमधून गोळा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सर्वोच्य न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
अदानी समूहावर नेमका कोणता आरोप?
अदानी समूहावर आयात केलेल्या कोळश्याच्या किमती दरवर्षी वाढवून महाराष्ट्र आणि गुजरात मधील कंपन्यांची फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. वर्ष 2016 पासूनच देशात या प्रकरणाचा तपास सुरु आहे आणि याआधी देखील गुप्तचर विभागाकडून अदानी समूह आणि सिंगापूर प्रशासन यांच्यातील व्यवहारांची कागदपत्रे गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यावेळीची लढाई समूहाने जिंकली होती आणि म्हटले होते कि भारतीय अधिकाऱ्यांनीच बंदरातून कोळशाच्या शिपमेंटचे आणि त्याच्या किंमतीचे मूल्यांकन केले होते .
याशिवाय अदानी समूहाची एक उपकंपनी म्हणजे अदानी पॉवर्स यांच्यावर देखील महाग किमतींमध्ये कोळसा आयात केल्याचा आरोप गुजरात उर्जा विकास निगम लिमिटेड यांच्याकडून लावण्यात आला होता. त्यांनी आरोपात म्हटले होते कि अदानी समूह इंडोनेशियाकडून खरेदी केलेला कोळसा दर वाढवून भारतीय बाजारात विकत आहेत. आता पुन्हा एकदा हि आरोपाची फाईल उघडली गेली असल्यामुळे सरकारचा गुप्तचर विभाग नेमकी कोणती माहिती समोर आणतो आणि यानंतर अदानी समूहावर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणं आकर्षक ठरणार आहे.