Adani Groups : अदानी समूह ‘या’ कंपनीचा हिस्सा विकत घेणार? बड्या उद्योगपतीशी बोलणी झाल्याच्या चर्चा

बिझनेसनामा ऑनलाईन । येत्या काही दिवसांतच गौतम अदानी एक नवीन डील हाती घेणार आहेत. सध्या अदानी समूहासाठी (Adani Groups) जारी बाजारी घडामोडी फायद्याच्या ठरत नसल्या तरीही देखील अदानी समूहाकडून हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. ओरीयंट सिमेंट कंपनीचा काही हिस्सा अदानी विकत घेणार आहेत. कंपनीचे प्रवर्तक सीके बिर्ला यांनी गौतम अदानी यांच्यासोबत कंपनीचा काही हिस्सा विकण्याबाबत चर्चा केली आहे अशा बातम्या सध्या रंगत आहेत. कदाचित ह्या निर्णयामुळे अदानी समूहाच्या बिघडलेली परिस्थती काही प्रमाणात पूर्ववत होऊ शकते.

ओरीयंट सिमेंट नावाची एक कंपनी बाजारात काम करते, या कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी म्हणजेच आठवड्याच्या तिसऱ्या व्यावहारिक दिवशी 13 टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स 214.95 टक्क्यांवर असून 52 आठवड्यातील हा त्यांनी नोंदवलेला उच्चांक आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीचे प्रवर्तक सीके बिर्ला यांनी गौतम अदानी यांच्यासोबत कंपनीचा काही हिस्सा विकण्याबाबत चर्चा केली आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगत आहे तरीही या डील विषयी नेमकी खात्री देता येत नाही कारण बिर्लांनी केलेल्या व्हेल्यूयेशनची मागणी यामुळे डील अडकण्याची शक्यता आहे.

सिमेंटच्या व्यवसायात अदानी नंबर 1: Adani Groups

अदानी सिमेंट्स हि अदानी समूहाची (Adani Groups) एक उपकंपनी आहे आणि या कंपनीची एकूण क्षमता 110 मिलियन टन अशी आहे. तुम्हाला माहिती आहे का हि देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्षमता आहे. सीके बिर्ला समूह हा इमारत बांधकाम उत्पादनं, सिमेंट, पंखे आणि इलेक्ट्रोनिक उद्पादानांचा व्यवसाय करणारा एक औद्योगिक समूह आहे, ते गेल्या काही दशकांपासून सिमेंटच्या बाजारात व्यवसाय करतात.ओरीयंट सिमेंटबरोबर त्यांची 37.9 टक्क्यांची भागेदारी होती. आता अदानी आणि यांच्यात काही मोठी डील होते का हे पाहणं आकर्षक ठरणार आहे.