Adani Groups : गौतम अदानी विकणार 4099 कोटी रुपयांची कंपनी; काय आहे कारण?

Adani Groups : जसं कि आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून बाजारातील परिस्थिती हि काही अदानी समूहासाठी योग्य नाही. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर त्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते आणि त्या नंतर कंपनी एक न एक संकटाला तोंड देत उभी आहे. आज अदानी समूहाबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली असून यात अदानी समूह आपल्या एका उपकंपनीला पूर्णपणे विकण्याच्या तयारीत आहे. हि कंपनी नेमकी कोणाला विकली जावी यावर सध्या समूहाची चर्चा सुरु आहे.

Adani Groups विकणार ‘हि’ उपकंपनी:

समोर आलेली माहिती सांगते कि लवकरच अदानी समूह (Adani Groups) आपली खाद्य तेल बनवणारी उपकंपनी अदानी विल्मर (Adani Wilmar) पूर्णपणे विकून टाकणार आहेत. या कंपनीमध्ये अदानी यांची 43.97 टक्क्यांची मालकी आहे. आता सध्या मालकांकडून कंपनीसाठी एक योग्य अश्या ग्राहकाची शोध मोहीम सुरु असून येत्या एका महिन्याभरात निकाल समोर येईल अशी अशा केली जाऊ शकते. अद्याप तरी गौतम अदानी किंवा इतर पदाधिकाऱ्यांकडून याबद्दल कोणतीही माहिती समोर आणलेली नाही तरीही अदानी आपली हि कंपनी 2.5 ते 3 अरब डॉलर्सना विकतील अश्या चर्चा केल्या जात आहेत. अदानी विल्मर्स कि कंपनी सिंगापूरमधल्या विल्मर इंटरनेशनल कंपनीचा एक जॉईन्ट वेंचर आहे.

का विकणार अदानी विल्मर?

या उपकंपनीचे एकूण बाजरी भांडवल 4099 कोटी रुपये आहे. सध्या अदानी समूह पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चर वर लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन तयार करत असल्यामुळे इतर क्षेत्रांमधून काढता पाय घेण्याचा विचार सुरु आहे. अदानी समूहाच्या निर्णयामुळे कंपनीच्या शेअर्सवर याचा परिणाम नक्कीच दिसून येईल, या बातमीप्रमाणे आता कंपनीचा नवीन मालक कोण होतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.