Adani Groups : ग्रीन हायड्रोजनबाबत अदानी समूहाचा मोठा प्लॅन; 33,300 कोटी उभारण्याची तयारी

Adani Groups : गौतम अदानी हे देशातील एक प्रसिध्द उद्योगपती म्हणून ओळखले जातात. काही त्यांच्या अदानी समूहा विरुद्ध हिडनबर्गने एक अहवाल जारी केला होता ज्यामध्ये त्यांनी कंपनीच्या विरोधात काही गंभीर केले होते, आरोपांच्या परिणामी अदानी समूहाला फार मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागलं होतं. अदानी समूहाची संकट काही इथेच थांबली नसून आत्तापर्यंत त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागत आहे. पण आज आलेली बातमी ही अदानी समूहासाठी आनंदाची वार्ता म्हणावी लागेल. सातत्याने वाईट प्रसंगांना सामोरे जात असलेल्या अदानीसमूहाला नेमकी कुठली आनंदाची बातमी मिळाली आहे हे जाणून घेऊया…

गौतम अदानी करणार नवीन गुंतवणूक : Adani Groups

सध्या गौतम अदानी ग्रीन हायड्रोजन (Green Hydrogen) प्रकल्पासाठी चार अब्ज डॉलर्स, म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 33 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. तरीही अदानी समूहाकडून याबद्दल अजून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नसल्यामुळे खरोखर माहिती नेमकी काय आहे याचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. अदानी समूहाकडून जून महिन्यात एक घोषणा करण्यात आली होती, ज्यात त्यांनी उल्लेख केला होता की भारतात ग्रीन हायड्रोजन आणि संबंधित उत्पादन करण्यासाठी एक मोठी गुंतवणूक करण्याची योजना ते आखत आहेत. म्हटलं जातं की अदानी समूहाची ही गुंतवणूक जर का यशस्वी ठरली तर देशातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

गेल्या काही दिवसांपासून अदानी समूह (Adani Groups) अनेक हाल अपेष्टा सहन करत आहे. कंपनीसोबत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे सुमारे वीस लाख कोटी रुपयांपर्यंत नुकसान झालेले आहे, गंभीर परिस्थितीत अदानी समूहाला जर का पुन्हा एकदा बाजारात आपले स्थान मिळवायचे असेल तर हा प्लॅन यशस्वी होणे त्यांच्यासाठी फारच महत्त्वाचा आहे, हा प्लॅन जर का योग्यरित्या यशस्वी झाला तर त्यांचे शेअर्स वाढण्यास मदत होईल.

अदानी सध्या नेमका कसा विचार करत आहेत:

प्रकल्प यशस्वी करण्यासाठी अदानी समूह सध्या आंतरराष्ट्रीय कर्जदारांचे संपर्क साधत आहे, याबद्दल काही ठोस पुरावे मात्र उपलब्ध नाहीत कारण स्वतः अदानी समूहाकडून याबद्दल कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. हा प्रकल्प उभा करण्याचे काम अदानी न्यू इंडस्ट्रीजकडे सोपवण्यात असल्याची चर्चा सुरू आहे. आपल्या देशात पर्यावरण वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत, देशातील प्रत्येक नागरिकाला पर्यायावरणाचे महत्त्व पटावे आणि प्रत्येकाने याबाबतीत काहीतरी पाऊल उचलावे म्हणून सरकार नेहमीच प्रयत्नशील असतो. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे भारतातील मोठे उद्योजक मानले जातात. अशावेळी त्यांच्याकडून ग्रीन एनर्जीवर लक्ष केंद्रित केलं गेल्यामुळे सरकारला फारच मोठी मदत होत आहे