Adani Groups : अदानी समूह लवकरच विकत घेणार अजून एक सिमेंट कंपनी

Adani Groups : सध्या अदानी समूहावर आरोप करण्यात आला आहे कि ते परदेशातून कोळसा आणून देशातील बाजारात अधिक किमतीने विकत आहेत, यासोबतच अदानी समूहावर कोळसा आयातीच्या बापतीत फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे आणि म्हणूनच अदानी समूहाच्या विरोधात लवकरच सरकार पुन्हा एकदा तपासणी सुरु करणार आहे. हे आर्थिक वर्ष अदानी समूहासाठी काही चांगले नाही आणि एका मागोमाग एक अश्या अनेक संकटांना तोंड देत त्यांनी आपला व्यवसाय सुरु ठेवला आहे. आता मात्र अदानी समूह (Adani Groups) अजून एक सिमेंटची कंपनी काबीज करण्याच्या तयारीत आहे, कोणती आहे हि कंपनी जाणून घेऊया…

अदानी समूह आणखी एक कंपनी खरेदी करणार: (Adani Groups)

VADRAJ CEMENT LIMITED असे ह्या कंपनीचे नाव असून अदानी समूहाव्यतिरिक्त अनेक कंपन्या या खरेदी विक्रीच्या शर्यतीत सामील झाल्या आहेत. वडराज सिमेंट हि Beumer Technology India ची उपकंपनी आहे आणि वर्ष 2018मध्ये थकबाकी भरण्यासाठी उच्च न्यायालयाने कंपनी बंद पडण्याचा आदेश दिला होता.

वडराज सिमेंट या कंपनीवर सध्या 7 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. आणि कर्ज घेतलेल्या बँकांमध्ये एक नाही तर अनेक बँकांचा समावेश आहे, यामध्ये पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, यूको बँक आणि येस बँक यांचा समावेश दिसून येतो. अदानी समूह (Adani Groups) हा अनेक मोठ्या सिमेंट उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे आणि त्यांच्या उत्पादनाची क्षमता हि 65 दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे तसेच संपूर्ण देशात त्यांचे अनेक कारखाने पाहायला मिळतात.