बिझनेसनामा ऑनलाईन । मागच्या काही दिवसांपासून गौतम अदानी आणि अदानी समूह (Adani Groups) या संकटांचा सामना करत आहेत. विशेषतः हिडनबर्ग आणि त्यांच्याविरुद्ध जाहीर केलेल्या अहवालामुळे त्यांनी समूहाला मोठा प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. त्यानंतर इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये चाललेल्या युद्धाचा विपरीत परिणाम सुद्धा अदानी समूहावर होताना दिसला, अशा अनेक संकटांमधून कसेबसे वाट काढत असताना पुन्हा एकदा कंपनीला एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. अश्या बाह्य परिस्थितीमुळे कंपनीचे शेअर देखील घसरताना दिसतात, एकूण मिळकतीत सुद्धा घट होताना दिसत आहेत. त्यातच आता अदानींचा समोर नेमके कोणते संकट येऊन ठेपले आहे हे जाणून घेऊया…
अदानीच्या समोर उभे आहे नवीन संकट: Adani Groups
उद्योगपती गौतम अदानी यांचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे आणि त्यांचीच कंपनी म्हणजेच अदानी समूह. हि कंपनी (Adani Groups) आजकाल अनेक संकटांना तोंड देताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या चाललेली परिस्थिती पाहता कंपनीच्या समोर येणारी संकटे मागे सरण्याचा नाव घेत नाही आहेत. त्याचे नवीन संकट हे ग्रुपच्या संबंधित असलेल्या एका ऑडिट फर्मच्या संबंधित आहे. ही फर्म गौतम अदानी यांच्या पाच कंपन्यांचे ऑडिट करते.
समोर आलेल्या माहितीनुसार FRI ने म्हणजेच नॅशनल फायनान्शिअल रिपोर्टिंग अथोरिटीने अदानी समूहाकडून कंपनीच्या ऑडिटशी संबंधित काही फाईल्सची त्वरित मागणी केली आहे. वर्ष 2014 पासून आतापर्यंत ऑडिटच्या संबंधित झालेल्या सर्व घडामोडींची देखरेख आणि पाहणी करण्यासाठी या फाईल्स मागवल्या गेल्या आहेत. कंपनी नेमका कोणता तपास करते आहे, हि प्रक्रिया कधी संपणार आणि त्यानंतरचा निर्णय अदानीच्या पक्षात कि विरोधात जाहीर होणार हे अद्याप सांगता येत नाही.
ही फर्म नेमक्या कोणत्या कंपन्यांचे ऑडिट करते?
ऑडिट फॉर्म एस आर बाटलीबॉय अदानींचा एकूण पाच कंपन्यांचे ऑडिट करते. याआधी त्यांनी अदानी पोर्ट आणि स्पेशल इकॉनोमिक झोनचे ऑडिट केले होते. SR काढून केल्या जाणाऱ्या ऑडीटिंमध्ये अदानींच्या पाच कंपन्या सामील आहेत, ज्यांचा महसूल हा 50 टक्क्याहून अधिक असतो. अदानी समूहाच्या विरुद्ध झालेली सर्वात मोठी तक्रार म्हणजे हिडनबर्गचा रिपोर्ट होता, कसेबसे यातून सावरत पुन्हा आपले स्थान निर्माण करत असताना समूहासमोर आता ह्या नवीन चौकशीचा काय परिणाम होतो हे पाहणं आकर्षक ठरणार आहे .