Adani Groups: गौतम अदानी हे देशातील अनेक प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योजाकांपैकी एक आहेत. हल्लीच त्यांनी सिमेंटच्या क्षेत्रात बाजी मारली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारा हा व्यवसाय यशाची शिखरं गाठत आहे. आता याच अदानी समूहाकडून एक नवीन कंपनी सुरु करण्यात आली आहे. हि नवीन गुंतवणूक त्यांच्या यशाच्या प्रवासात नक्कीच भर घालणार अशी अपेक्षा केली जात आहे. आता नेमकी कोणती आहे हि कंपनी आणि तिचे कामकाज काय हे जाणून घेऊया..
गुजरातमध्ये अदानी सुरु करणार नवीन कंपनी : Adani Groups
अलीकडेच अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZL) ने एका नवीन कंपनीची स्थापना केली आहे, या उपकंपनीला उदानवत लीजिंग IFSC लिमिटेड असे नाव देण्यात आले आहे. समोर आलेली माहिती सांगते कि हि कंपनी विमानाची मालकी आणि भाडेतत्त्वाचा व्यवसाय (Aircraft ownership and leasing business) करेल.
कंपनीबद्दल थोडक्यात:
गौतम अदानींची हि नवीन कंपनी गुजरात येथे GIFT सिटी गांधीनगर मध्ये सुरु केली जाईल, आत्तापर्यंत केवळ कंपनीच्या सुरु होण्याची घोषणा करण्यात आलेली असून तिचे कामकाज अद्याप सुरु झालेले नाही. कंपनीचे एकूण भांडवल 2.5 कोटी रुपये असून ते एकूण 10 रुपयांच्या 25,00,000 इक्विटी शेअर्समध्ये विभागले गेले आहे.अदानी समूह (Adani Groups) सध्या वैमानिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे, यात सप्टेंबर वर्ष 2022 मध्ये अदानी एव्हिएशन फ्यूल्स लिमिटेडचाही समावेश केला गेला होता. या कंपनीची सुरुवात विमान वाहतूक संबंधित इंधनाचे सोर्सिंग, वाहतूक, पुरवठा आणि व्यापार यासाठी केली आहे.