Adani Groups : अदानी ग्रुप्सच्या मॅनुफॅक्चरमध्ये येत्या काही दिवसांत बदल होणार आहे. सध्या अदानी ग्रुप्सची मॅनुफॅक्चरिंग कॅपेसिटी 4GW अशी आहे. मात्र आलेल्या माहितीनुसार वर्ष 2027 पर्यंत ती वाढून 10GW करण्यात येणार आहे. हि नवीन मॅनुफॅक्चरिंग कॅपेसिटी गुजरात मधील अदानी मुद्रा स्पेशल इकोनोमिक झोनमध्ये बसवली जाणार आहे. काय आहे हि नवीन कॅपेसिटी जाणून घेऊया.
Adani Groups सुरु करणार नवीन मॅनुफॅक्चरिंग कॅपेसिटी:
2027 पर्यंत अदानी समूह (Adani Groups) गुजरातमध्ये नवीन सोलर मॅनुफॅक्चरिंग कॅपेसिटी सुरु करणार आहे. सध्या अदानी समूह 4GW ने काम करतात व यात वाढ करत येत्या काही वर्षातच ते 10GW पर्यंत झेप घेणार आहेत. सध्या Conglomerate हि जगातील सर्वात मोठी सोलर मेनिफेक्चारिंग कॅपेसिटी असलेली कंपनी आहे, व सध्या भारतात सोलर पेनल्स वाढती मागणी पाहता हि कंपनी आपला व्यवसाय आपल्या देशात वाढवण्याच्या तयारीत आहे.
अदानी समूहाला मिळाली आहे मोठी ऑर्डर:
अदानी समूहाला मागच्या काही दिवसांत 3,000MW च्या ऑर्डर्स मिळाल्या होत्या आणि येत्या पंधरा महिन्यांत त्या ऑर्डर्स पूर्ण होतील अशी अपेक्षा केली जात आहे. या स्पर्धात्मक जगात कायम राहत अदानी समूहाने (Adani Groups) USD 394 मिलिअन एवढी मोठी कमाई केली आहे. पाहायला गेलं तर मागच्या काही वर्षांमध्ये भारतात सोलर एनर्जी मध्ये वाढ झाली. जो आकडा मार्च 2014 मध्ये फक्त 2.63GW होता त्यात वाढ होऊन यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात 71.10GW वर पोहोचला, मात्र मॅनुफॅक्चरिंग युनिट या गरजा पुरवण्यासाठी कमी पडल्याने हि जबाबदारी अदानी समूहासारख्या खासगी कंपन्यांकडे आली.
अदानी सोलरचा असा आहे प्रवास:
अदानी ग्रीन एनर्जीच्या यशानंतर अदानी समूहाने (Adani Groups) वर्ष 2016 पासून अदानी सोलरचा प्रवास सुरु केला. सध्या अदानी सोलर यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखलं जात आहे. 1.2GW सेल पासून सुरु झालेला हा प्रवास दिवसेंदिवस प्रगती करत आहे. आज फक्त सहा वर्षांनंतर अदानी सोलर यांच्याजवळ 4GW सेल कॅपेसिटी(Cell Capacity) आहे. गुजरात मध्ये सुरु होणारी सोलर सेल हि देशातील सर्वात मोठी सोलर सेल असणार आहे, तसेच या प्रोजेक्टमुळे 13,000 लोकांना रोजगार तयार होणार आहेत. अदानी समूहाने उचलेल्या या एका मोठ्या पाऊलामुळे देशाचे नाव जगभरात होईल हे नक्की.