Adani Hindenburg Case : गौतम अदानींना सर्वात मोठा दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणी अमेरिकेकडून क्लीन चीट

Adani Hindenburg Case : संकटं चालून आली कि ती भल्या भल्याचं जीवन कठीण करू शकतात, मग याला श्रीमंत किंवा गरीब असा अपवाद असत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटं ही येणारंच. आपण वेळोवेळी खंबीरपणे त्यांचा सामना केला पाहिजे. देशातील श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी हे देखील संकटांपासून पळू शकलेले नाहीत. अमेरिकेतील कंपनी हिडेनबर्ग यांच्या एका अहवालामुळे अदानी समूहाची संपूर्ण दुनियाच बदलून गेली होती. सदर खटला देशातील सर्वोच्य न्यायालयात सुरु असतानाच अदानी समूहासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ज्याचा परिणाम थेट त्यांच्या शेअर्सवरही दिसून आला होता. हिंडेनबर्ग प्रकरणी अमेरिकेकडून गौतम अदानी यान क्लीन चीट देण्यात आली आहे.

हिंडेनबर्ग प्रकरणी अदानी निर्दोष आहेत का? (Adani Hindenburg Case)

अमेरिकेतील शोर्ट सेलर कंपनी हिडेनबर्ग यांनी अदानी समूहावर गंभीर आरोप (Adani Hindenburg Case) केले होते. या हेराफेरीच्या आरोपांचा सामना, अदानी समूह गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहे. यानंतर अदानी समूहाचे शेअर्स अत्यंत बिकट परिस्थितीत व्यवहार करत होते, तसेच या आरोपाच्या कचाट्यात सापडलेल्या समूहाची कितीतरी संपत्ती देखील नष्ट झाली आहे, अदानी समूहाचे मार्केट कॅप देखील 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक घसरले. यानंतर सदर प्रकरणाची चौकशी अनेक एजन्सीस द्वारे सुरु करण्यात आली होती. अलीकडेच भारतातील सर्वोच्य न्यायालयाने अदानी समूहाविरुद्ध हिडेनबर्गने जारी केलेला अहवाल विश्वास ठेवण्यास पात्र नाही असे म्हटले होते, अद्याप प्रकरणाचा तपास संपलेला नसला तरीही अदानी समूहासाठी यानंतर दिवस बदलायला सुरुवात झाली होती.

अमेरिका सरकारची क्लीन चिट:

आधी नमूद केल्याप्रमाणे अनेक एजन्सीस या प्रकरणाचा तपास करीत होत्या आणि अमेरिका सरकारकडून सदर प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला असल्याने त्यांनी समूहाला क्लीन चिट दिली आहे. अमेरिका सरकारचे हे सकारात्मक पाऊल समूहासाठी आशेचा किरण म्हणावा लागेल. यानंतर अदानी समूह (Adani Group) पूर्ववत कामगिरी करून दाखवेल यात कोणतीही शंका उरलेली नाही. अमेरिका सरकारच्या म्हणण्यानुसार अदानी समूहावर लावलेले आरोप हे निराधार आहेत, आणि म्हणूनच त्यांनी हिडेनबर्ग यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अमेरिका सरकार कडून निर्दोष सिध्द झाल्यामुळे काही अंशी समूहाचे संकट टाळले आहे. सध्या चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अदानी समूह श्रीलंकेत एका बंदराच्या कामात गुंतलेला असून, हा प्रकल्प जर का अदानी समूहाने यशस्वी करून दाखवला तर दक्षिण आशियातील चीनचा प्रभाव कामी व्हायला मदत होईल. सदर प्रकल्पासाठी समूह अमेरिकेकडून कर्ज घेणार असून त्याआधीच अमेरिका सरकारने त्यांना निर्दोष म्हटल्याने आता शंकेची सुई हिडेनबर्गवर रोखली गेली आहे.