Adani-Hindenburg Case: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अदानींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की….

Adani-Hindenburg Case: काळ सकाळीच सर्वोच्च न्यायालयाकडून हिंडनबर्ग प्रकरणी गौतम अदानी आणि अदानी समूहाच्या पक्ष्याच्या राखून ठेवलेला निर्णय जाहीर करण्यात आला. वर्षभरापासून अदानी समूह हिंडेनबर्गच्या अहवालामुळे कठीणाईचा सामना करत होता आणि आता मोठा काळ लोटल्यानंतर समूहाला आशेचा किरण दिसू लागला आहे. अमेरिकेतल्या शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गने समूहाविरुद्ध फसवणूक आणि घोटाळ्याचे गंभीर आरोप लावले होते आणि याच्याच परिणामी समूहाच्या प्रतिष्ठेवर याचा वाईट परिणाम झाला होता. अनेक गुंतवणूकदारांनी समूहाची साथ सोडली तसेच कंपनी शेअर्स बऱ्यापैकी घसरले. एक वर्ष हा बराच मोठा कार्यकाळ आहे, या कठीण प्रसंगी कंपनी आणि स्वतः गौतम अदानी यांनी राखलेले धर्य आणि साधलेले प्रसंगावधान यांमुळे हा कठीण काळ ते पार करू शकले आहेत. सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानंतर चहू बाजूंनी गौतम अदानी यांचे अभिनंदन केले जात आहे. मात्र यावर गौतम अदानी यांची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घेऊया…

निकालानंतर काय म्हणाले गौतम अदानी:(Adani-Hindenburg Case)

सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. आणि या निर्णयावर गौतम अदानी यांनी “विजय हा नेहमी सत्याचाच होतो, सत्यमेव जयते!!” म्हणत आपला आनंद व्यक्त केला आहे. 24 नोव्हेंबर 2023 रोजी सर्वोच्य न्यायालयाने आपला निकाल राहून ठेवला होता, जो आज सर्वांसमक्ष खुला करण्यात आला आहे. यानंतर सोशल मीडियाचा वापर करत गौतम अदानी यांनी कठीण काळात त्यांच्या सोबत कायम राहिलेल्या सर्व परिचित आणि अपरिचित लोकांचे आभार मानले आहेत. सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानंतर खऱ्याची बाजू जगासमोर आली आहे असे म्हणत त्यांनी यापुढे देशाची वृद्धी होण्यासाठी ते कायम योगदान देत राहतील असे वचन दिले आहे.

सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानुसार आता कुणीही सेबीच्या चौकशीत नाक खुपसू नये, कारण सेबी आपले काम योग्य रित्या पार पडत आहे (Adani-Hindenburg Case). आत्तापर्यंत सेबी ने 24 पैकी 22 घटकांचा तपास पूर्ण केला असून बाकी 2 घटकांचा तपास पूर्ण करण्यासाठी त्यांना न्यायालयाकडून तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

हिंडेनबर्गने समूहावर लावले होते गंभीर आरोप:

अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग यांनी भारतातील अदानी समूहावर हेराफेरी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप लावले होते(Adani-Hindenburg Case). या अहवालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 85 टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळाली तसेच गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संपत्तीत ६० अरब डॉलर्सची घट झाली. या संपूर्ण प्रकरणाचा देश विदेशातून कसून तपास सुरु होता. याआधी अमेरिकेने समूहाला क्लीन चिट दिली होती मात्र सर्वोच्य न्यायालयाचा निकाल जाहीर न झाल्याने सर्वांच्या मनात शंकेची पाल कायम चुकचुकत राहिली होती.