Adani Hindenburg Case बाबत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल; नेमकं काय घडलं

Adani Hindenburg Case: गेल्या काही दिवसांपासून अदानी आणि हिंडेनबर्ग यांच्या प्रकरणाचा तपास अनेक एजन्सी काढून सुरू करण्यात आला होता. गेल्या वर्षी अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनी म्हणजेच हिंडेनबर्ग रीसर्च यांनी अदानी समूहाच्या विरोधात एक अहवाल जारी केला होता. या अहवालात त्यांनी अदानी समूहावर फेरफार आणि अकाउंटिंग च्या बाबतीत घोटाळा केल्याचे आरोप केले होते. अदानी समूहाकडून तत्काळ हे आरोप फेटाळून लावल्यानंतरही त्यांना याचा गंभीर परिणाम भोगावा लागला होता. गेल्या वर्षभरात अदानी समूहाचे शेअर्सना उतरती काळा लागली होती, तसेच अनेक गुंतवणूकदारांनी समूहाला कायमचा रामराम ठोकला होता. अमेरिकेने अदानी समूहाला निरपराध ठरवल्यानंतरही भारतात सेबी कडून या सर्व प्रकरणाचा तपास सुरूच होता आणि काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा अहवाल निराधार ठरवण्यात आला, मात्र न्यायालयाचा निकाल मात्र अद्याप जाहीर करण्यात आला नव्हता. आज या सर्व प्रकरणाला पूर्णविराम लागलेला असून सर्वोच्च न्यायालयाने अदानी आणि हिंडर्नबर्ग प्रकरणी आपला निकाल जाहीर केला आहे.

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल? (Adani Hindenburg Case)

अदानी समूह आणि अमेरिकेतील कंपनी हिंडनबर्ग यांच्यातील ही लढाई गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. हिंडेनबर्गने अदानी समूहावर फसवणुकीचे आरोप केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याची चौकशी सुरू केली होती. सेबीकडून या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात आला होता , व आज न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार सेबीच्या तपासात FPI नियमांशी संबंधित कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही. अदानी आणि हिडनबर्ग प्रकरणावर आपला निकाल (Adani Hindenburg Case) देताना CJIDY चंद्रचूड यांच्या तीन सदस्य खंडपीठाने हा निकाल जाहीर केला आहे.

न्यायालयाकडून सेबीला 24 प्रकरणांची चौकशी करण्यास सांगितले होते, ज्या पैकी दोन प्रकरणांचा तपास अद्याप प्रलंबित आहे आणि सीबी कडून हा तपास येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात यावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या अगोदर 24 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सेबी आणि इतर समितीच्या तपासावर उपस्थित करण्यात आलेले प्रश्न पूर्णपणे फेटाळून लावले होते व केवळ मीडियाच्या रिपोर्टनुसार सेबीवर आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगत आपला निर्णय राखून ठेवला होता (Adani Hindenburg Case).

असा होता हिंडेनबर्ग चा अहवाल:

गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले होते (Adani Hindenburg Case). या गंभीर आरोपांच्या परिणामी अदानी समूहाला भल्या मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला होता. न्यायालयात सुमारे एक वर्षभर सुरू असलेला हा खटला आता पूर्णत्वास आला असून, अदानी समूह या नवीन वर्षात नक्कीच उत्तम कामगिरी बजावेल अशा अपेक्षा केली जात आहेत. हिंडर्नबर्गचे आरोप तात्काळ फेटाळून लावल्यानंतर अदानी समूहाने बाजारात आपले प्रस्थ पुन्हा स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते व या प्रयत्नांना आता यश मिळत आहे.