Adani Hindenburg Case : SEBI चा तपास संपला!! अदानींना क्लीनचीट की अडचण वाढली?

Adani Hindenburg Case : काही दिवसांपूर्वी Hindenburg ने सादर केलेल्या अहवालामुळे गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला भलामोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला होत. या एक अहवालामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये बऱ्यापैकी घसरण होताना दिसली. या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सर्वोच्य न्यायालयाकडून SEBI वर सोपवण्यात आली होती, आणि आता सेबीने सर्वोच्य न्यायालयाला अजून जास्ती वेळेची गरज नाही असे सांगितल्यामुळे अदानी समूहाविषयीचा हा तपासा संपलाय अश्या चर्चांना उधाण आलंय. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर (Adani Hindenburg Case) अदानी समूहासाठी मागचे सहा महिने खरोखर कठीण गेले.मात्र यातून सावरत कंपनी एवढ्या कमी वेळात नफा कमवेल अशी कल्पना देखील कोणी केली नसेल. अजून कंपनीचे शेअर्स पूर्ववत झालेले नसले तरीही मागच्या सहा महिन्यांच्या तुलनेत त्यांनी कमालीची कामगिरी करून दाखवली आहे.

Adani Hindenburg Case ची चौकशी करायला जास्ती वेळ नको: SEBI

जानेवारी महिन्यात अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने एका अहवालात अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप केले होते. आणि यामुळे अदानी समूहाने मोठ्या नुकसानीचा सामना केला. समूहाकडून तत्काळ हे आरोप फेटाळून लावण्यात आले होते तरीही त्यांचे बाजार भांडवल सुमारे 150 अब्ज डॉलर्सनी घसरले. या वाईट परिणामांचा सामना कंपनीच्या गुंतवणूकदरांनी देखील केला होता, आणि म्हणूनच त्यांच्याकडून सर्वोच्य न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. ज्यानंतर सर्व प्रकारचा शोध घेण्याची जबाबदारी सेबीवर सोपवण्यात आली होती.

सेबीला यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. तरीही वेळेआधीच सेबीने न्यायालयाकडे मुदतवाढीची मागणी केली व तीन महिन्यांची मुदतवाढ मिळवली, ही मुदत 14 ऑगस्ट रोजी संपली आहे. सेबीने सद्यस्थितीचा अहवाल न्यायालयात सादर केला (Adani Hindenburg Case) असला तरीही अंतिम आणि महत्वाचा निकाल अजून जाहीर झालेला नाही. मात्र सर्वोच्य न्यायालयात चालेल्या सुनावणीच्या दरम्यान सेबीचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टला सांगितले कि आता तपास करण्यासाठी सेबीला अधिक वेळ देण्याची गरज नाही, त्यामुळे खरोखर तपासाला पूर्णविराम लागला आहे का अशी शंका अनेकांच्या मनात घर करून आहे. तसेच याप्रकरणी गौतम अदानी यांना दिलासा मिळणार की त्यांची अडचण वाढणार हे पाहायला हवं.