बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर बाजारातील नियामक सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBI या आठवड्यात अंतिम अदानी -हिंडेनबर्ग अहवाल (Adani Hindenburg Case) सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील हिडनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर काही गंभीर आरोप केले होते. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने SEBI ला तपासणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 14 ऑगस्ट ला सुनावणीचा दिवस ठरवण्यात आला होता. यामध्ये बऱ्याच गोष्टीवर फोकस करण्यात आलेला असून सेबी करत असलेल्या तपासणीमध्ये बरेच प्रश्न अदानी समूहावर उपस्थित करण्यात येणार आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने यूएसस्थित हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलेल्या आरोपांबाबत अंतिम अहवाल तयार केला आहे. अदानी समूहाने किमान सार्वजनिक शेअर होल्डिंग मानदंडा मधील त्रुटींचा फायदा घेऊन शेअर्सच्या किमतीमध्ये हेराफेरी केल्याच्या आणि संबंधित पार्टी लेनदेण केल्याचा आरोप (Adani Hindenburg Case) लावण्यात आला होता. त्यानंतर अडाणी समूहाचा स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली बघायला मिळाली होती. यामुळे आगामी समूहाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून एका महिन्यामध्ये अदानी समूहाचा स्टॉक 85 टक्क्यांपर्यंत घसरला.अदानी समूहावर लावण्यात आलेल्या आरोपांचा परिणाम हा त्यांच्या बाजार भांडवलावर पडल्याच दिसून येत आहे.
29 ऑगस्टला सुनावणी – (Adani Hindenburg Case)
त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सेबीला तपासणी पूर्ण करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी 14 ऑगस्ट पर्यंत ची मुदत दिली होती. आता 29 ऑगस्टला याबद्दल सुनावणी करण्यात येणार आहे. सेबीच्या तज्ञ समितीने या आधी न्यायालयामध्ये दिलेल्या अर्जात वेळ वाढवून मागवली होती. गौतम अदानी यांच्या कंपनीमध्ये कोणताच हेराफेरी चा नमुना दिसला नव्हता. आणि कोणतेच नियमक अपयशही दिसले नव्हते. हे असताना देखील वेगळ्या गोष्टींचा तपास करण्यासाठी वेळ मागवण्यात आला आहे.