Adani-Hindenburg Case आजही तेवढीच गरम; SEBI शोधणार गुंतवणूकदारांची ओळख

Adani-Hindenburg Case : मागच्या काही दिवसांपासून देशात गौतम अदानी आणि हिंडेनबर्ग यांच्याबद्दल चर्चा सुरु आहेत. हिंडेनबर्ग यांनी अदानी समूहावर हेराफेरीचे गंभीर आरोप लावल्यामुळे समूहाला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला होता. कंपनीचे शेअर्स आणि मार्केट कॅप दोन्ही आकड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळाली होती. हा विषय गंभीर असल्यामुळे अनेक संस्था सादर प्रकरणाची चौकशी करीत होत्या आणि त्यानंतर अमेरिका सरकारने हिंडेनबर्गचे आरोप फोल असल्याचा निकाल देत अदानी निर्दोष असल्याचे कबुल केले आहे. हि बातमी अदानी समूहाच्या दृष्टीने फारच महत्वाची ठरली, यानंतर त्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आलेली पाहायला मिळाली. भारतात देखील अदानी आणि हिंडेनबर्ग यांचा खटला सुरूच आहे, याबद्दल नवीन बातमी काय आलीये जाणून घेऊया…

EPFI च्या नावे जारी केली नोटीस: (Adani-Hindenburg Case)

भारतात सर्वोच्य न्यायालयाने काही अंशी अदानी समूहाला आशेचा किरण दाखवलेला असला तरीही अद्याप हा वाद अजून कायमचा संपलेला नाही. नवीन माहितीनुसार SEBI कडून अनेक विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना (EPFI) करणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीस जारी झालेले सर्व गुंतवणूकदार अदानी समूहाशी निगडित आहेत. या सर्वांनी अदानी समूहामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली असल्यामुळे आता त्यांना सेबीच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत.

SEBI कडून अदानी आणि हिंडेनबर्ग यांच्या चौकशीनंतर (Adani-Hindenburg Case) सर्व गुंतवणूकदारांना हि नोटीस पाठवण्यात आली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार हि कारणे जाणून घेऊन सेबीने त्यांना खरी मालकी उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत. सर्व प्रकरणामध्ये खरा लाभार्थी कोण आहे हे सांगण्यात EPIF असक्षम ठरल्याचा दावा सेबीने केला आहे.

जानेवारी महिन्यात हिंडेनबर्गने अदानी समूहाविरुद्ध आरोप केल्यानंतर (Adani-Hindenburg Case) दर महिन्याला समूहाचे शेअर्स घसरत जात होते. हिंडेनबर्गने सादर केलेल्या अहवालात नाव असलेल्या अनेक गुंतवणूकदारांनी ताबडतोब समुहामधून आपल्या गुंतवणूका मागे घेतल्या होत्या, तसेच काहींनी कायमची समूहाकडे पाठ फिरवली होती.

हिंडेनबर्गचे असे होते आरोप:

अमेरिकेमधली शॉर्ट शेलार हिंडेनबर्ग यांनी भारतातील अदानी समूहनावर हेरफेरीचे गंभीर आरोप लावले होते, मात्र प्रकरण इथेच थांबत नसून, या अहवालामध्ये इतर अनेक आरोपांचा समावेश होता अन हे आरोप खळबळजनक होते. आणि यातीलच एका आरोपाप्रमाणे (Adani-Hindenburg Case) गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाचा कुणा एका मार्गाने समूहाशी संपर्क जोडलेला आहे. म्हणूनच आता अदानी समूहामध्ये मोठी गुंतवणुकी केलेल्या या गुंतवणूकदारांची खरी ओळख SEBI ला शोधून काढायची आहे.