Adani News: अदानी Green Energy Limited या कंपनीच्या Adani Green Energy 24 A आणि Adani Green Energy 24 B या दोन उपकंपन्यांनी गुजरात राज्यातील खावड़ा येथे 551 मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे आणि जो भारताच्या ऊर्जा सुरक्षेत मोलाची भर घालेल. या नवीन प्रकल्पांमुळे AGELची एकूण कार्यरत अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता 9,029 मेगावॅटवर पोहोचली आहे, लक्ष्यात घ्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ही भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे.
अदानींचा नवीन प्रकल्प कोणता? (Adani News)
AGEL, 2030 पर्यंत 45 GW क्षमतेचा आपला दृष्टीकोन पूर्ण करण्याच्या मार्गावर चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. 13 फेब्रुवारी रोजी या प्रकल्पाला मंजूरी मिळाल्यानंतर, दुसऱ्या दिवसापासूनच कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल. तसेच, यानंतर अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरची किंमत 14 फेब्रुवारी 2024 रोजी वाढली. अदानींच्या शेअर्सची किंमत वाढली म्हणजे काय?, तर याचा अर्थ असा की गुंतवणूकदार या कंपनीमध्ये अधिक पैसे गुंतवण्यास इच्छुक आहेत. कंपनीचे मार्केट कॅप देखील वाढले, ज्यामुळे कंपनीची एकूण किंमत देखील वाढली आहे.
सकाळी 11:52 वाजताच्या सुमारास NSE वर अदानी ग्रीन शेअरची किंमत 1.94 टक्क्यांनी वाढून 1850.70 रुपये झाली, याच वेळी BSE वर शेअर 1.76 टक्क्यांनी वाढला होता तसेच कंपनीचे मार्केट कॅप 2,92,911.37 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले होते(Adani News). अदानी समूहातील अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीने तिमाही निकालांमध्ये वर्षभरात 256 कोटीपर्यंत निव्वळ नफा कमावला. या दमदार कामगिरीमुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.