Adani Powers : गौतम अदानी ही कंपनी विकत घेणार? सिमेंटनंतर या क्षेत्रात दबदबा निर्माण करणार

Adani Powers :अदानी समूहाचे नाव देशातील अनेक मोठ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये घेतलं जातं. अदानी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उद्योगपती आहेत, मागे हिंडनबर्गच्या अहवालामुळे त्यांच्या शेअर्स मध्ये नक्क्कीच घसरण झाली होती मात्र आता पुन्हा एकदा अदानी समूह परतीच्या मार्गावर आहे, त्यांच्या कंपनीकडून अनेक करार केल्या जाण्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी जपानसोबत संधान बांधल्यानंतर अदानी आता नवीन मोहिमेच्या तयारीत आहेत, नक्की काय आहे बातमी पाहूयात…

अदानी विकत घेणार ही कंपनी : Adani Powers

अदानी समूह आपला व्यवसाय अजून बळकट करण्यासाठी कोस्टल एनर्जी (Coastal Energen) ही कंपनी ताब्यात घेऊ शकतो. हा करार जर का पुर्णपण यशस्वी झाला तर अदानी समूह पूर्णपणे दक्षिण बाजारपेठेवर राज्य करण्याची शक्यता आहे. अदानी समूहाची अदानी पॉवर्स हि उपकंपनी नवीन धागा जोडण्याच्या तयारीत आहे. एक समोर आलेला अहवाल सांगतो कि दोन दिवसांपूर्वी  कोस्टल एनर्जी या कंपनीची बोली लावली जात होती, जिथे अदानी पोवार्स यांनी बाजी मारत कंपनीच्या पदाधिकाऱ्यांची मनं जिंकली.  कोस्टल एनर्जीला ताब्यात घेण्यासाठी सलग दोन दिवस बोली लावली जात होती जी शनिवारी संध्याकाळ पर्यंत सुरु राहिली, या दरम्यान 18 फेऱ्यांमध्ये निविदा काढण्यात आल्या होत्या, जिथे बोलीच्या 19व्या फेरीत अदानी पॉवरला यश मिळाले (Adani Powers).

दरम्यान, कोस्टल एनर्जीची तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 600 मेगावॅटची दोन ऑपरेशनल युनिट्स आहेत. कोस्टल एनर्जीन दिवाळखोर झाल्यानंतर कॉर्पोरेट दिवाळखोरीच्या प्रक्रियेत गेली. सध्या या कंपनीचे पॉवर प्लांट अजूनही कार्यरत आहेत.यामुळेच शेरीशा टेक्नॉलॉजीज, जिंदाल पॉवर आणि डिकी अल्टरनेटिव्ह यांसारख्या कंपन्या कोस्टल एनर्जीच्या ताब्यात घेण्यास खूप रस दाखवत होत्या.