बिझनेसनामा ऑनलाईन । भारतातील सर्वात मोठा व्यावसायिक ग्रुप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये (Adani Shares) घसरण पाहायला मिळाली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे अबू धाबी येथील एका मोठ्या कंपनीने अदानी समूहाच्या २ कंपन्यांमधून आपली हिस्सेदारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या एका निर्णयामुळे अदानी समूहाच्या शेअर्सवर मोठा परिणाम झाला आहे. आता या दोन कंपन्या नेमक्या कोणत्या व अदानी समूहाला एवढे नुकसान का सोसावे लागते हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा.
कोणती कंपनी अदानी समूहामधील हिस्सेदारी विकणार?
अबू धाबीतील इंटरनेशनल होल्डिंग कंपनीने( International Holding Company-IHC) अदानी समूहाच्या २ कंपन्यांमधून आपली हिस्सेदारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या २ कंपन्या म्हणजे अदानी ग्रीन एनर्जी( Adani Green Energy) आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स ( Adani Energy Solutions) या आहेत. IHC ने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे आता अदानी समूहाच्या शेअर्सवर मोठा परिणाम झाला आहे. IHC हि UAE मधली सर्वात मोठी कंपनी आहे, ज्याचे मार्केट कॅप UAE 235.98 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्ती आहे. सध्या गौतम अदानी यांचा फसवणूकीच्या आरोपांविरोधात लढा सुरु असताना IHC चा हा निर्णय त्यांच्यासाठी डोकेदुखी झाली आहे.
अदानी समूहावर नेमका परिणाम काय? Adani Shares
IHC च्या मोठया निर्णयाचा परिणाम म्हणजे या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये( Adani Shares) बरीच मोठी घसरण झाली आहे.अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स 1.66 टक्क्यांनी घसरून 816.40 रुपयांवर स्थिरावले आहेत. तर अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 1.01 टक्के घसरून 1001.55 रुपयांवर आहेत.IHC बॉम्बे स्टोक एक्सचेंजनुसार ग्रीन एनर्जी आणि ग्रीन ट्रान्स्मिशन अदानी समूहातील त्यांचे 1.26( Adani Green) आणि 1.41( Adani Solutions) टक्के असे शेअर्स विकणार आहेत. सध्या या दोन्ही कंपन्यांमधील IHCच्या गुंतवणुकीचा अंदाज घेतल्यास ती एकूण 3,327 कोटी रुपये आहे.