Adani Shares : इस्रायल- हमास युद्धामुळे गडगडलेल्या अदानी शेअर्समध्ये पुन्हा वाढ

Adani Shares : काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं कि इस्रायल आणि हमास यांच्यात चालेल्या भीषण युद्धाचा परिणाम आपल्या देशातील गुंतवणूकदरांवर झाला. भारत आणि इस्रायल यांच्यातील व्यावसायिक संबंध चांगले असल्यामुळे भारतातील अनेक गुंतवणूकदार इस्रायल सोबत जोडले गेले होते. यातील एक सर्वात परिचित नाव म्हणजे गौतम अदानी. गौतम अदानी आणि इस्रायेल यांच्यात गुंतवणुकीच्या चर्चा झाल्या होत्या, तिथल्या सर्वात मोठ्या बंदरावर अदानी काम करणार आहेत. मात्र अचानक परिस्थिती बिघडल्यामुळे त्याचा वाईट परिणाम अदानीना भोगावा लागतो कि काय असा प्रश उभा राहिला होता, मात्र एक चांगली बातमी समोर आली आहे ती काय हे पाहूया…

Adani Shares मध्ये वाढ, समूहाला आनंदाची बातमी:

गौतम अदानी यांच्या अदानी समूहासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या चांगली कामगिरी बजावत आहेत व त्यांच्यात वाढ देखील पाहायला मिळाली. अदानी समूहाचे सर्व दहा शेअर्स ग्रीन झोनमध्ये आले आहेत. इस्रायेल आणि हमास यांच्यात चालेल्या युद्धामुळे अदानी समूहाच्या शेअर्सवर वाईट परिणाम झाला होता आणि ते तेजीत घसरत होते मात्र आता त्यात 3 टक्यांपेक्षा जास्ती वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

इस्रायल येथील सर्वात मोठे बंदर म्हणजे हैफा बंदर होय, या बंदरावर अदानी समूहाची मालकी आहे. अचानक सुरु झालेल्या युद्धामुळे परिस्थिती बिकट झाली आहे आणि अनेक गुंतवणूकदर घाबरल्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घट झाली. यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखत अदानी समूहाने समोर येत सांगितले कि हैफा बंदर हे इस्रायल देशाच्या उत्तर भागात आहे, आणि युद्ध दक्षिण भागात सुरु आहे. यानंतर गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला व कंपनीच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

अदानी समूहाचे हैफा मधील स्टॉक :

अदानी समूहाकडून आलेली माहिती असं सांगते कि कंपनीच्या एकूण माल वाहतुकीमध्ये हैफा पोर्टचा वाट हा फक्त 3 टक्के आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अदानी पोर्टची मालवाहतूक 203 मिलियन मेट्रिक टन होती, ज्यात हैफचा वाट फक्त 60 मेट्रिक टन होता. अदानी समूहाचा या प्रकल्पात सर्वात मोठा वाटा आहे, त्यामुळे हैफा पोर्ट हा अदानी यांच्या मालकीचा आहे.अदानी समूहाच्या शेअर्समध्ये (Adani Shares) वाढ होण्याचं हे अजून एक कारण मानलं जात आहे.