Adani vs Ambani : सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? मुकेश अंबानी की गौतम अदानी

Adani vs Ambani : देशातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणजे गौतम अदानी आणि मुकेश अंबानी. या दोघांमध्ये नेहमीच स्पर्धा सुरु असते. गेल्या अनेक दिवसांपासून अदानी समूह हिंडेनबर्गने सादर केलेल्या अहवालामुळे चर्चेचा विषय बनला होता, आणि सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देणारा निकाल सादर झाल्याने काही अंशी समूहाला आधार मिळाला आहे. त्यानंतर समूहाने पुन्हा मागे वळून पहिले नाही, कंपनीचे शेअर्स जोरदार कामगिरी बजावत होतेच पण सोबतच गौतम अदानी यांची वैयक्तिक संपत्ती वाढल्याने ते संपूर्ण आशिया खंडात सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले होते. आज मात्र बाजी पुन्हा पालटली, कारण रिलायंस ग्रुपचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आपले सर्वोच्य स्थान पुन्हा काबीज केले आहे. मागच्या दिवसांमध्ये चर्चेचा विषय बनलेले गौतम अदानी काही दिवसांसाठी सर्वोत्तम बनले खरे मात्र त्याच्या पाठोपाठ असलेल्या मुकेश अंबानी यांनी आपली जाग पुन्हा मिळवली असून सध्या तेच आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत.

अंबानींची संपत्ती किती? (Adani vs Ambani)

अदानी आणि अंबानी यांच्यात नेहमीच पहिले स्थान काबीज करण्याची शर्यत कायम असते. सध्याच्या माहितीनुसार पुन्हा एकदा मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर परत आले आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार आता मुकेश अंबानींची नेटवर्थ 97.5 बिलियन डॉलर्स वर जाऊन पोहोचली आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे केवळ 24 तासांमध्ये मुकेश अंबानींच्या संपत्तीमध्ये 536 मिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर आता मुकेश अंबानी 12 व्या स्थानी असून, आशियामधील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून मुकेश अंबानी यांनी आपले नाव कोरले आहे.

गौतम अदानी यांच्यासाठी परिस्थती मात्र पूर्णपणे विरुद्ध होती, गेल्या 24 तासांत त्यांच्या संपत्तीमध्ये एकूण 3.09 बिलियन डॉलर्सची घट झाल्याने त्यांची एकूण संपत्ती 94.05 बिलियन डॉलर्स वर आली आहे. परिणामी ते आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून, संपूर्ण देशातील 14 वे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत(Adani vs Ambani). गौतम अदानी यांच्या अदानी समूहाचे शेअर्स वर्ष 2022 मध्ये कमालीची कामगिरी करीत होते, त्यांची एकूण संपत्ती 120 बिलियन डॉलर्सच्या जवळपास पोहोचली होती आणि परिणामी वर्ष 2023 च्या सुरुवातील त्यांनी जगभरातील टॉप-30 श्रीमंत लोकांमध्ये जागा मिळवली होती. त्यानंतर सादर झालेल्या हिंडेनबर्गच्या अहवालाने समूहाची दुनियाच बदलून टाकली, आणि गौतम अदानी थेट टॉप-30 श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर पडले होते. आता मात्र अदानी समूह प्रगतीच्या मार्गावर असून येणाऱ्या काळात ते अधिकाधिक प्रगती करतील अशी अपेक्षा आहे.